लोकसभा लढवण्याबाबात दोन दिवसांत निर्णय घेऊ : शरद पवार

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पुन्हा लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वाढली आहे. तसं राजकीय वर्तुळात चर्चांनी जोर धरला आहे. कालपर्यंत लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा नाही, असं शरद पवार यांनी म्हटले होते. मात्र आज दि ९ फेब्रुवारी, राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांबरोबर चर्चा करुन दोन दिवसात उमेदवारीबाबत निर्णय घेऊ, पवार यांनी असे  म्हटलं आहे. सांगोल्यात दुष्काळी परिषद सुरु आहे. तिथं त्यांनी हे मोठे वक्तव्य केले आहे.

माढ्याचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहितेपाटील यांनी माढा लोकसभा मतदार संघातून शरद पवार यांनी निवडणूक लढवावी, अशी जाहीर मागणी केली होती. यापुर्वी शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने आमदार गणपतराव देशमुख, राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी देखील पवारांनी माढयातून लोकसभा निवडणूक लढवण्याची मागणी केली आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी अशी विनंती राष्ट्रवादीचे माढ्याचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील आणि जवळपास सर्व वरीष्ठ सहकाऱ्यांनी केली. माझी इच्छा नाही, पण विचार करु, असं शरद पवार यांनी काल सोलापुरात म्हटलं होतं. त्यावर आता दोन दिवसात निर्णय घेऊ, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्याने आता शरद पवार हे माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्या मध्ये चर्चेली जात आहे आणि कार्यकर्त्या मध्ये उत्साह वाढला आहे. जर शरद पवार हे माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणार असतील तर सोलापूर जिल्हा आणि त्या लगतच्या लोकसभा मतदार संघांवर त्याचा चांगला परिणाम होऊ शकतो. तसेच त्यांच्या या उमेदवारी चा विधानसभा निवडणुकांसाठी चांगला फायदा ही होऊ शकतो