शरद पवारांनी दिले चंद्रकांत पाटील यांना ‘हे’ उत्तर

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाईन – माझे वय झाल्यामुळे मी माढा मतदारसंघातून निवडणूक लढवू नये असे म्हणणाऱ्या भाजप नेत्यांनी माझ्या तब्येतीची काळजी करु नये असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पवारांना सल्ला दिला होता.

माढा लोकसभेतून लढण्याबाबत विचार करू असे म्हणून शरद पवार यांनी लोकसभा निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत. माढा लोकसभा मतदारसंघातून जर शरद पवार उभा राहिले तर विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुनर्वसन कुठे करायचे हा देखील मोठा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस समोर आहे. विजयसिंह मोहिते पाटील यांनी हि पक्ष निष्ठा दाखवत पक्ष देईल ते काम करण्याचे ठरवले असल्याचे सध्या तरी चित्र आहे.

शरद पवार यांच्या माढा मतदारसंघातून निवडणुकीला उभे राहिले तर त्यांना भाजप पराभूत करेल असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी काल केले होते. माढा लोकसभा मतदारसंघात आमची पक्षात्मक बांधणी मजबूत झाली असल्याने माढा मतदारसंघात शरद पवार उभा राहिले तर भाजप त्यांचा पराभव करेल असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते. तसेच शरद पवार हे बारामती मतदारसंघातून उभे राहिले तर आम्हाला त्यांचा पराभव करणे आम्हाला कठीण जाईल असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

दरम्यान ४८ पैकी ४४ जागांचे जागावाटप पूर्ण झाले आहे अशी माहिती शरद पवार यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना पंढरपुरात दिली. प्रकाश आंबेडकर यांना जागा वाढवून देण्याच्या बाबत चर्चा सुरु असून लवकरच त्यांच्या सोबत आघाडीचा निर्णय पूर्णत्वास जाईल असे शरद पवार म्हणले आहेत.

गडकरी सध्या  पंतप्रधान पदाच्या शर्यदित आहेत त्याबद्दल आपले काय मत आहे असे विचारले असता शरद पवार म्हणाले कि ते जर पंतप्रधान झाले तर मला आनंद आहे कारण ते माझे खूप चांगले मित्र आहेत असे शरद पवार म्हणाले आहेत. मात्र मला त्यांची काळजी वाटते आहे असे शरद पवार म्हणाले आहेत.

राज ठाकरे यांच्या बद्दल विचारले असता शरद पवार म्हणाले कि काही मुद्द्यावर त्यांचे आणि आमचे मतऐक्य असले तरी त्यांना सोबत घेऊन निवडणूक लढण्याचा आमचा कोणता विचार नाही असे शरद पवार म्हणाले आहेत. त्यामुळे राज ठाकरे तुमच्या सोबत येणार का या मुद्दयांवर स्वतः शरद पवर यांनीच पडदा टाकला आहे.