पार्थ पवार आणि रोहित पवार यांच्याबद्दल शरद पवारांचे मोठे वक्‍तव्य

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पार्थ पवार निडवणूक लढवणार नाहीत, रोहित पवार निवडणूक लढवणार नाहीत. शरद पवार निवडणूक लढवणार आहेत असे वक्‍तव्य शरद पवार यांनीच केले आहे. त्यामुळे आता पार्थ पवार आणि रोहित पवार हे आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा – ‘आमच्या घरातील मुलांनी राजकारणात येऊ नये’ : सुप्रिया सुळे

गेल्या काही दिवसांपासुन पार्थ पवार हे मावळ लोकसभा मतदार संघातुन निवडणूक लढवणार असल्याची मोठी जोरदार चर्चा सुरू होती. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पार्थ आणि रोहित यांच्याबद्दल असे वक्‍तव्य केल्यामुळे होणार्‍या सर्व चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे. एमआयटी शिक्षण संस्थेच्या लोणी काळभोर येथील संकुलात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्‍वरूढ पुतळयाच्या अनावरणप्रसंगी शरद पवार उपस्थित होते. कार्यक्रम अटोपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

हेही वाचा – ‘आनंद दिघेंना कुणी मारलं वगैरे नाही’, नारायण राणेंना उशिरा सुचलेलं शहाणपण 

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभुमीवर सध्या राजकीय वातावरण तापले आहे. माजी मुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार मावळ मतदार संघातुन लोकसभेची निवडणूक लढविणार असे बोलले जात होते. पार्थ पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये जनसंपर्क देखील वाढविला होता. पार्थ पवार यांनी पिंपरी-चिंचवड परिसरातील विकास कामांचा आढावा देखील घेतला होता. गेल्या आठवडयात पार्थ पवार यांनी चिंचवड येथील मोरया गोसावी मंदिरात बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी प्रचाराचा श्रीगणेशा केला असल्याचे देखील वृत्‍त होते. मात्र, शरद पवार यांनी पार्थ आणि रोहित पवार हे निवडणुक लढवणार नाहीत असे स्पष्ट केले आहे. आता मावळ लोकसभा मतदार संघातुन राष्ट्रवादी कडून कोण निवडणुक लढविणार याबाबत प्रचंड उत्सुकता वाढला आहे.