राहुल गांधी म्हणजे मोहात पाडणारा नेता : शत्रुघ्न सिन्हा

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपचे नेते मात्र भाजपचेच शत्रु म्हणजे शत्रुघ्न सिन्हा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे कौतुक केले आहे. राहुल गांधी हे मोहात पाडणारे नेते आहेत, असे शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटले आहे. सिन्हा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून तसं ट्वीट केलं आहे.


राहुल गांधी यांनी संसदेत दिलेलं भाषण उत्तम आहे. काँग्रेस अध्यक्ष म्हणून त्यांचा प्रभाव चांगला पडतो आहे. अत्यंत कमी वेळेत त्यांनी उत्तम प्रगती केली आहे. त्यांचा आत्मविश्वासही दुप्पट झाला आहे. तीन राज्यातल्या विजयानंतर राहुल गांधी यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे, असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

तसंच राहुल गांधी यांनी आधीच्या तुलनेत प्रचंड फरक पडला आहे. त्यांनी केलेली प्रगती उत्तम आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सिन्हा हे भाजपच्या गोट्यातील बंडखोर नेते आहेत. पूर्वीपासून ते भाजपच्या योजनांवर टीका करत होते. तर गेल्या काही दिवसांपासून ते काँग्रेस आणि इतर विरोधकांच्या मंचावरून भाजपवर टीकास्त्र सोडताना दिसत आहेत. नुकतीच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आयोजित केलेल्या महारॅलीतही सिन्हांनी उपस्थिती लावली होती. आता राहुल गांधी यांच्या केलेल्या कौतुकावर भाजप त्यांना काय आणि कसं उत्तर देते हे पाहणे महत्त्त्वाचे ठरणार आहे.