अबब… विहिरींत सापडल्या तब्बल १५ दुचाकी  

राजूर :  पोलीसनामा ऑनलाइन – दिवसेंदिवस दुचाकी चोरींच्या घटना समोर येत आहेत. तर पुणे येथे दुचाकी पेटवल्याच्या घटना समोर येत आहेत. मात्र आता कहरच झाला आहे, न जळलेल्या, न तोडफोड झालेल्या, तब्बल १५ दुचाकी विहिरीत आढळून आल्या आहेत.

दुचाकी चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत जात आहे. इतकेच नव्हे तर पुणे येथे काही दिवसांपूर्वी दुचाकी जाळण्यात आल्या होत्या, मात्र अकोला तालुक्यातील कळस येथील पुला जावळील असलेल्या विहिरीत दोन दुचाकी असल्याचे तेथील शेतकऱ्याला कळले, दरम्यान त्या शेतकऱ्याने त्या संदर्भात पोलिसांना कळविले, घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी घाटांसाठी धाव घेतली, दरम्यान पोलिसांनी त्या विहिरीतून दोन दुचाकी बाहेर काढल्या, तसेच आणखी तपस करत असता शेजारील विहिरीचीही तपासनी केली त्यावेळी त्या विहिरी मध्ये तब्बल १३ दुचाकी आढळल्या. दरम्यान त्या सर्व दुचाकी विहिरीच्या बाहेर काढण्यात आल्या.

विशेष म्हणजे त्या प्रकरणाची चौकशी केली असता, सर्व दुचाकी चोरीच्या असल्याचे समोर आले. तसेच विहिरींचा शोध घेतल्या नंतर आणखी काही दुचाकी विहिरींमध्ये असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच त्या बाबत शोधही सुरु केले आहेत.

याचबरोबर आतापर्यंत आढळलेल्या १५ दुचाकी अकोले आणि संगमनेर तालुक्यातून दीड दोन वर्षापूर्वी चोरीला गेलेल्या आहेत. चोरांनी या गाड्यांचे काही पार्ट काढून घेतले आणि मोटरसायकली विहिरीत टाकून दिल्या आहेत. असेही समोर आले आहे.