युतीच्या घोषणेवरून सोशल मीडियाने शिवसेनेला केले ट्रोल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – भाजप शिवसेनेची युती होण्याचे स्पष्ट संकेत मिळायला लागल्या पासून शिवसेनेला सोशल मीडियाने ट्रोल करायला सुरुवात केली आहे. सिंहगर्जना करून शिवसेना स्वबळावर लढेल यापुढे कसलीही युती केली जाणार नाही असे म्हणणारे उद्धव ठाकरे आता अमित शहा यांच्या सोबत युतीच्या घोषणेची पत्रकार परिषद घेत आहेत. भाजपने आमचा मुका घेतला तरी आम्ही युती करणार नाही असे म्हणणारे संजय राऊतच माध्यमात युतीचे संकेत देऊ लागले. शिवसेनेच्या अशा दुटप्पी धोरणे सोशल मीडिया सध्या त्यांच्यावर टीकेची झोड उठवत आहे.

शिवसेनेने युतीची बोलणी कराताना भाजपला लोकसभेसोबत विधानसभेच्या देखील जागावाटपावर बोलणी करण्याची अट पुढे केली. त्यानंतर मुख्यमंत्री ,उद्धव ठाकरे, चंद्रकांत पाटील आणि सुभाष देसाई दोन्ही पक्षाच्या दोन-दोन नेत्यांना सोबत घेऊन युतीची अंतिम बोलणी करण्यात आली. त्यानंतर यावर आज अमित शहा यांनी अखेरचा हात मारला आणि उद्धव ठाकरे आणि अमित शहा या दोघांनी मुख्यमंत्र्याच्या सह युतीची घोषणा केली आहे. लोकसभेसाठी भाजप २५ तर शिवसेना २३ तर विधानसभेसाठी निम्या-निम्या जागा दिल्या जाणार आहे. मात्र हा निर्णय नेटकऱ्यांना पटला नाही. त्यांनी शिवसेनेला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

शिवसेनेचा वाघ आता लाचार झाला आहे अशी प्रतिमा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या चित्रात वाघाच्या चेहऱ्याच्या ठिकाणी मांजराचे तोंड लावण्यात आले असून वाघ मृत पावला असल्या प्रमाणे भिंतीला त्याची प्रतिमा लावण्यात आली आहे. तर वाघाच्या शेपटीतून कमळ फुलले आहे असे दाखवण्यात आले आहे.
66061954.jpg

तर एका चित्रात भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे उद्धव ठाकरे यांना मुष्टियुद्धात पराभूत केले आहे असे दाखवण्यात आले आहे.
1515638858.jpg

तर शिवसेनेच्या मंत्र्यांचे राजीनामे कुठे गेले असा खोचक सवाल सोशल मीडियाने विचारला आहे. तर काही लोकांनी उद्धव ठाकरे यांनी २८ फेब्रुवारी २०१८ रोजी केलेल्या ट्विटचे स्क्रीनशॉट व्हायरल केले जात आहेत. त्यात उद्धव ठाकरे यांनी आम्ही युती करणार नाही तसेच भाजप शिवाय महाराष्ट्र भगवा करू असे म्हणले होते. अशा स्वरूपाच्या प्रतिमा आणि मॅसेज तसेच जोक्स मधून शिवसेनेला ट्रोल केले जात आहे.