कपिलधार येथे शिवा संघटनेचा राज्यव्यापी मेळावा 

अकाेला : पाेलीसनामा ऑनलाईन– वीरशैव-लिंगायतांचे श्रध्दास्थान शिवयोगी मन्मथ स्वामींच्या समाधीचीशासकीय महापुजा व शिवा संघटनेच्या २३ व्या वार्षिक राज्यव्यापी मेळाव्याचे आयोजन कार्तिक पोर्णिमा २२ नोव्हेंबर रोजी श्रीक्षेत्र कपिलधार येथे करण्यात आले आहे.

यावर्षी शिवयोगी मन्मथ स्वामींच्या समाधीची १७ वी शासकीय महापूजेकरिता राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास तथा बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे,महादेव जानकर, प्रा. राम शिंदे, जयकुमार रावल, विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, आमदार विनायक मेटे, बीडचे जिल्हाधिकारी, शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोडे, अनेक शिवाचार्य व शिवा संघटनेचे राष्ट्रीय तथा राज्य पदधिकारी यांच्या उपस्तथितीत पार पडणार आहे.

शासनाने कपिलधारच्या विकासासाठी १०० कोटी रुपये जाहीर केले असून त्यातील पहिला टप्पा १० कोटीचा विकासनिधी प्राप्त झाल्याने श्रीक्षेत्र कपिलधार येथे जागतिक दर्जाचे बेलवन तयार करण्यात येत आहे. शिवा संघटनेव्दारे दरवर्षी स्तरावरील वीरशैव-लिंगायत समाजातील विशेष कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा शिवा राष्ट्रीय भूषण पुरस्कारने सन्मानित करण्यात येत असताे. यावर्षीच्या पुरस्कारांमध्ये शहीद शुभम मुस्तापुरे यांना मरणोत्तर सन्मानित करण्यात येणार आहे.

वाशीम येथील रेखा सागर रावले व सागर रावले या दाम्पत्यांनी वाशीम ते जम्मू काश्मिरपर्यंत सायकलिंग करत अत्यंत साहसी वृत्तीने देशभरातील समाजाला राष्ट्रभक्तीचा आणि प्रदुषण मुक्तीचा संदेश दिल्याबद्दल उत्कृष्ट राष्ट्रनिष्ठा प्रदुषणमुक्ती अभियान पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच सुरज दिधाते नागपूर, अजय होणराव अ. नगर व निलेश महाजन हिंगोली यांना शिवा सोशल मीडिया राष्ट्र भूषण पुरस्काराणे सन्मानीत करण्यात येणार आहे.

अकाेला जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजबांधवांनी हजारोंच्या संख्येने श्रीक्षेत्र कपिलधार (जि.बीड) येथे उपस्थित राहण्याचे आवाहन शिवा संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे, महाराष्ट्र उपाध्यक्ष भिमाशंकर खांदे, माजी विदर्भ प्रमुख संजय बोधेकर, शिवा संघटनेचे कर्मचारी महासंघ पदाधिकारी विलास मोदे, देवानंद बोंते, मनिष मखमले, डॉ सचिन डोंगरे, शिवा संघटना सोशल मीडिया प्रमुख मनीष पंधाडे, मंगेश मिटकरी आणि रुपेश वरणकर आदींनी केले आहे.