शुक्रवार पेठेतील गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी मोहोळला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शुक्रवार पेठेतील शिंदे आळीत भरदिवसा झालेल्या गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी नयन भाऊसाहेब मोहोळ (वय,२७ रा. हमालनगर, मार्केटयार्ड, पुणे)  याला खडक पोलीसांनी गुरुवारी पहाटे दिड वाजण्याच्या सुमारास खडकवासला येथून अटक केल्याची माहिती खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिली आहे.

पुण्यात भरदिवसा थरार….. युवकावर गोळीबार : युवक गंभीर जखमी 

गोळीबार प्रकरणी मंदार धुमाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रुपेश चंद्रशेखर पाटील, नयन मोहोळ, निखिल बाबर, शुभम बाबर, संग्राम खामकर, लुकमान नदाफ, विशाल गुंड व त्यांच्या चार ते पाच साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर रुपेश पाटील याने दिलेल्या फिर्यादिनुसार, मंदार धुमाळ, मंगेश धुमाळ, गणेश दारवटकर, अभिजित मोहिते, आकाश थापा व इतर चार ते 5 जनांनावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

हे मात्र अतिच झालं ; लक्ष्मीपूजनाला चक्‍क हवेत गोळीबार 

गोळीबारात मंगेश धुमाळ (वय ३२, रा. शिंदे आळी, शुक्रवार पेठ) जखमी झाला होता. धुमाळ याच्या गटातील गणेश दारवडकर व मंदार धुमाळ हे किरकोळ जखमी झाले होते. तर रुपेश पाटील आणि विशाल गुंड हेही  किरकोळ जखमी झाले होते.

गोळीबार झाल्यानंतर पोलीसांनी शिंदे आळीमध्ये बंदोबस्त तैनात केला होता. काहीकाळ परिसरात तणावाचे वातावरण होते. दोन्ही गटातील एकून १७ जणांवर गुन्हे करण्यात आलेले आहेत. त्यापैकी बहुसंख्य जणांना खडक पोलीसांनी अटक केली आहे. गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी नयन मोहोळ गोळीबार झाल्यापासून हा फरार होता. त्याचा शोध पोलीस घेत होते. दरम्यान, बुधवारी पोलीसांना तो खडकवासला जवळ येणार असल्याची माहिती मिळाली होती. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार खडक पोलीसांनी त्याला मध्यरात्री अटक केली आहे. नयन मोहोळ याच्याविरोधात यापूर्वी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे.