कोल्हापूर जिल्ह्यातील तेरा नायब तहसीलदारांच्या एकाचवेळी बदल्या

कोल्हापूर : पोलीसनामा पोलीसनामा  – कोल्हापूर जिल्ह्यातील १३ नायब तहसीलदारांच्या बदल्या करण्यात आल्या असून, त्याबाबतचा आदेश काढण्यात आला, तर पुणे विभागातील महसूलच्या ८२ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर महसूल विभागात मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्या असून, पुणे विभागातील तब्बल ८२ अधिकाऱ्यांच्या एकाच दिवशी बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून पाच जणांच्या परजिल्ह्यात बदल्या झाल्या आहेत. बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी तत्काळ बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याच्या सूचना आदेशात दिल्या आहेत.

आयुक्त तुकाराम मुंढेंचा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांना दणका 

जिल्ह्यातील बदली झालेल्या नायब तहसीलदारांमध्ये मीनल भांगरे-भोसले यांची करवीर तहसील कार्यालयातून करवीर विभागीय कार्यालयात बदली करण्यात आली आहे. नामदेव पवार यांची करवीर तहसील कार्यालयातून कागल तहसील कार्यालयात, शोभा कोळी यांची जिल्हाधिकारी कार्यालयातून पंढरपूर येथे, व्ही. बी. कोळी यांची कागलमधून पुणे, डी. डी. कोळी यांची आजरा तहसील, एस. एम. जोशी यांची हातकणंगले तहसील कार्यालयातून पन्हाळा तहसील कार्यालयात बदली करण्यात आली आहे.

त्याचबरोबर सुरेश मुंडे यांची आजरा तहसील कार्यालयातून पुणे येथे, व्ही. एन. बुटे यांची भुदरगड तालुक्यातून गडहिंग्लज तालुक्यात, ज्ञानेश्वर शेळकंदे यांची जिल्हाधिकारी कार्यालयातून पुणे, संतोष सानप यांची करवीरमधून पुणे, श्रावण ताते यांची पन्हाळा तहसीलमधून पुणे, माधवी शिंदे यांची पन्हाळा तहसीलमधून कोल्हापूर, तर रूपाली सूर्यवंशी यांची करवीर उपविभागीय कार्यालयातून गडहिंग्लज तहसील कार्यालयात बदली करण्यात आली आहे.