मुंबई विकास आराखड्याच्या प्रति इंग्रजीत छापल्याने शिवसेनेकडून प्रतींची होळी 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन 
मुंबई विकास आराखड्याच्या प्रति इंग्रजीत छापल्याच्या निषेधार्थ शिवसेनेकडून त्या प्रतींची होळी करण्यात आली. मुंबईतील कुर्ल्यामध्ये आराखड्याच्या प्रती जाळण्यात आल्या.
यावेळी शिवसेनेचे नगरसेवक दिलीप लांडे यांनी या प्रति मराठीत छापण्याची सरकारकडे मागणी केली आहे. राज्य सरकारने मुंबईचा विकास आराखडा इंग्रजीत छापून मराठी भाषेचा अपमान केला आहे असे ते हटले.
दरम्यान, मुंबईचा रखडलेला विकास आराखडा 26 एप्रिल रोजी मंजूर करण्यात आला. शहरात परवडणाऱ्या घरासाठी आतापर्यंतची सर्वाधिक जागा खुली करण्यात येणार आहे. तर 80 लाख जणांना रोजगाराच्या संधीचं उद्दिष्ट्य ठेवून कमर्शियल एफएसआय वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरातली गर्दी दुप्पट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.