चिमुकल्या बहिण भावाची विहिरीत बुडवून हत्या

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – धानोरा, ता.चोपडा येथील मुस्लीम वाड्यातील रहिवासी लहान भाऊ व बहिणीला संशयित खालीद शेख. इस्माईल (वय २९) रा.धानोरा याने विहिरीत फेकून त्यांची हत्या केल्याची घटना उघडकीस आली असून संशयितास पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान दोन्ही बालकांवर अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून गुन्हेगार हा त्यांचा नातेवाईक असल्याचेही बोलले जात आहे.

अधिक असे की, येथील मुस्लिम वाड्यातील रहिवासी शे.खालीद शे. ईस्माइल याने सायंकाळी त्याच्या शेजारील भाऊ बहीण. शे.तनवीर शे महेबूबखान (वय ३) व निजबा ( मिजबा ) शे. महेबूबखान (वय ५) वर्ष या भाऊ बहिणीला बोरं खाऊ घालतो, असे आमिष दाखवून त्यांना शेतात घेऊन गेला. हा दिवस धानोरा बाजाराचा असल्याने शेतकरी वर्ग शेतातून लवकर घरी आले होते. त्यामुळे शेती शिवारात कुणीच नसल्याने ही संधी साधून संशयिताने बालकांना विहिरीत फेकून दिले. इकडे रात्री उशिरापर्यंत मुले घरी न आल्याने आई,वडिल, नातलग यांनी शोधाशोध केली; परंतु त्यांचा तपास न लागल्याने पोलीस पाटील दिनेश पाटील यांना सांगितले. त्यांनी अधिक तपास केला असता शे. खालीद हा इसम मुलांना घेऊन बिडगाव रस्त्याकडे जात असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले पो. पा. यांनी त्यास विश्वासात घेतले असता मी त्या दोघा बालकांना विहिरीत फेकल्याची माहिती त्याने दिली. त्यास लागलीच अडावद पोलिसांनी ताब्यात घेऊन बालकांचे शोधकार्य सुरू केले. परंतु आरोपी परिसरातील वेगवेगळ्या विहिरी दाखवत असल्याने रात्री उशिरापर्यंत शोध लागला नाही. पुन्हा सकाळी धानोरा शिवारात शोध घेत असतांना गट नंबर ४०४- अ-१ अनंत बाजीराव पाटील यांच्या मालकीच्या शेतातील विहिरीजवळ बालीकेची चप्पल आढळली असता या विहिरीत दोघा चिमुकल्यांचे शव दिसले.

पाण्यात पोहणारे बोलवून सकाळी १०-३० वाजता विहिरीतून दोन्ही शव बाहेर काढून शवच्छेदनासाठी चोपडा उपरूग्णालयात नेण्यात आले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत अडावद पो. स्टे.ला महेबूबखान हबीबखान यांच्या फिर्यादीवरून संशयिताविरूद्ध भादंवि कलम ३६३,३०२,२०१ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संशयितास कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नातलगांकडून होत आहे. याप्रसंगी चोपडा विभागीय पोलीस अधिकारी सौरभ अग्रवाल उपस्थित होते. तर अडावद पोलीस .स्टेशनचे सपोनि राहुलकुमार पाटील, पो.काँ. राजेंद्र इंगळे, योगेश गोसावी आदिंनी चोख बंदोबस्त ठेवला. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सौरभ अग्रवाल हे करीत आहेत.

दरम्यान, मयताचे डीएनए रक्ताचे नमुने तपासणीसाठी नाशिक येथील प्रयोग शाळेत पाठवित असल्याची माहिती गजानन राठोड यांनी दिली. प्रयोग शाळेतून अहवाल प्राप्त झाल्यानंतर या गुन्ह्यात वाढीव कलम लावले जातील, असे संकेत त्यांनी दिले. सायंकाळी शवविच्छेदन झाल्यानंतर बालकांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी संशयंीत खालीद यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.