अनंतनागमध्ये चकमकीत ६ दहशतवाद्यांना कंठस्नान 

जम्‍मू काश्मीर : वृत्तसंस्‍था – जम्मू- काश्मीरमधील अनंतनागमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली असून या चकमकीत सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. गेल्‍या दोन दिवसांपासून अनंतनाग जिल्‍ह्यातील बिजबेहर येथील सेकीपोरा परिसरात गेल्‍या दोन दिवसांपासून ही चकमक सुरू आहे. या परिसरात दहशतवादी घुसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. परिसरात आणखी दहशतवादी लपून बसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
अनंतनागमधील बीजबहेरा परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. शुक्रवारी पहाटे सैन्य, जम्मू- काश्मीर पोलिसांच्या पथकाने संयुक्त मोहीम राबवली. परिसराला सुरक्षा दलांनी वेढले आणि शोधमोहीम सुरु झाली. यादरम्यान दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक झाली. या चकमकीत सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. परिसरात अजूनही शोधमोहीम राबवली जात आहे.
गुरुवारी लष्कराच्या कुलगाम छावणीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात कुलगाममधील एक नागरिक मृत्यूमुखी पडला होता. मंगळवारीदेखील हिजबूल मुजाहिद्दीनच्या चार दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी ठार केलं होतं.
जम्मू- काश्मीरमध्ये गेल्या तीन दिवसात सुरक्षा दलाला मिळालेले हे दुसरे मोठे यश आहे. २० नोव्हेंबर रोजी शोपियाँ येथे दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीतही चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. तर सुरक्षा दलातील एक जवानही या चकमकीत शहीद झाला होता. तर गुरुवारी कुलगाम येथील सैन्याच्या तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात एक स्थानिक नागरिक जखमी झाला होता. सैन्याच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर देताच दहशतवादी पसार झाले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांना थेट आव्हान दिलं. हिज्बुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांनी थेट श्रीनगरच्या मध्यभागात असलेल्या लालचौक परिसरात बैठक घेतली आहे. या बैठकीमध्ये जवळपास 10 दहशतवादी उपस्थित होते. बैठकीनंतर हिज्बुलचा कमांडर उमर माजिद उर्फ हनजल्लानं या भागातील सेल्फीदेखील सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यामुळे जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

मटक्याच्या जुगाराने अनेकांना केले उध्वस्त ; पोलीस कारवाईची गरज