पुण्यात सहा वर्षीय मुलगा बोअर वेलमध्ये अडकला 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – यापूर्वी प्रिन्स बोअरवेलच्या खड्यात पडल्यानंतर देशभरात या घटनेने मोठी खळबळ उडवून दिली होती. या घटनेनंतर अनेक चिमुरडी मूलं बोअरवेलमध्ये पडल्याच्या घटना देखील आहेत मात्र अजुनाही याबाबतीत शहाणपण आलेले दिसत नाही त्याचाच परिणाम म्हणून पुण्यातील आंबेगाव मध्ये २०० फूट खोल बोअरवेलमध्ये सहा वर्षीय मुलगा पडला आहे. या मुलाला वाचवण्यासाठी नागरिक प्रयत्न करीत आहेत. तसेच एनडीआरएफला पाचारण करण्यात आल्याची माहिती नायब तहसीलदारांनी एका वृत्तवाहिनीला दिली आहे.

रवी पंडित मिल असं या मुलाचं नाव आहे. तो बोअरवेलमध्ये नेमका कसा पडला याबाबत अजून माहिती मिळू शकली नाही. बोअरवेल 200 फूट खोल असला तरी सुदैवाने रवी हा फक्त १० फुटांवर अडकला आहे. त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत.

उघडे बोअरवेल ही मोठी समस्या आहे. याअगोदरही मुलं खेळता खेळता बोअरवेलमध्ये पडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. आंबेगावातील घटनेचं नेमकं कारण कळू शकलेलं नाही. एनडीआरएफला पाचारण करण्यात आलं असून स्थानिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे.