‘व्हर्जिनिटी टेस्ट’ एमबीबीएसच्या (MBBS) अभ्यासक्रमातून वगळण्याची मागणी 

वर्धा : पोलीसनामा ऑनलाईन – समाजामध्ये आजही अनेक कुप्रथांचा सुळसुळाट आहे. त्यातील एक महत्वाची कुप्रथा म्हणजे व्हर्जिनिटी टेस्ट (कौमार्य चाचणी) आहे. कौमार्य चाचणीच्या नावा खाली महिलांच्या मानवी हक्काचे उल्लंघन केले वाजते आहे. त्याच प्रमाणे अनेक कुप्रथांना या माध्यमानातून उत्तेजन दिले जाते आहे. तसेच कौमार्य चाचणीच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करण्याचे हि दुष्कृत्य बऱ्याच ठिकाणी झाले आहे. वैद्यकीयशास्त्रात कसल्याही प्रकारचे संशोधन झाले नसलेली कौमार्य चाचणी वैद्यकीय अभ्यास क्रमातून वगळण्यात यावी अशी मागणी सेवाग्रामचे डॉ. इंद्रजित खांडेकर यांनी अहवालातून केली आहे.

वर्धा येथील सेवाग्राम मधील  महात्मा गांधी आयुर्विज्ञान संस्थेच्या न्यायवैद्यक शास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. इंद्रजित खांडेकर यांनी भारतीय वैद्यक परिषद, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विज्ञापीठाकडे कौमार्य चाचणी अवैज्ञानिक असल्याबाबतचा दावा करणारा अहवाल पाठवण्यात आला आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी हा अहवाला अभ्यासक्रम संशोधन समिती समोर ठेवणार असल्याचे म्हणले आहे. डॉ. इंद्रजित खांडेकर यांनी अहवालात म्हणले आहे कि, कौमार्य चाचणीला कसलाही वैज्ञानिक आधार नाही. त्यामुळे त्या संकल्पनेला अभ्यासक्रमातून वगळण्यात यावी असे म्हणले आहे. कौमार्य चाचणी हि लैंगिक शोषणाला उत्तेजन देणारी असून या दुष्कृत्यातून महिलांच्या मानवी हक्काचे हनन होते.

कौमार्याची तपासणी ‘टू फिंगर’ किंवा प्रोबद्वारे ही तपासणी या माध्यमातून केली जाते मात्र व्यक्तीनुसार हि चाचणी बदलत जाते. या चाचणी मुळे डॉक्टर आणि रुग्णाची हि दिशाभूल होते असे डॉ. खांडेकरांनी म्हणले आहे. कौमार्य चाचणी हि फक्त स्त्रियांसाठीत असते. पुरुषांच्या कौमार्य चाचणी बद्दल कसलाच उल्लेख वैद्यकीय अभ्यासक्रमात करण्यात आला नाही असे डॉ. खांडेकरांनी म्हणले आहे. टू फिंगर टेस्ट हि बलात्कार पीडित महिलेची केली जाणारी चाचणी हि डॉ. खांडेकरांच्या लढ्यानेच बंद झाली आहे. आता कौमार्य चाचणीचे काय करायचे असा सवाल हि डॉ. इंद्रजित खांडेकर यांनी विचारला आहे.