सामाजिक कार्यकर्ते बाबाजी पवळे यांचा ठाकर समाजमित्र पुरस्काराने गौरव

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

आदिवासी नोकरवर्ग ठाकूर व ठाकर समाज उत्कर्ष संस्था पुणे विभाग व आदिवासी ठाकर युवा,युवती प्रतिष्ठान पुणे यांच्या संयुक्त विध्यमानाने विदयार्थी गुणगौरव सोहळा  उत्साहात संपन्न झाला, यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाबाजी पवळे यांच्या कामाची दखल घेत त्यांना आदिवासी नोकरवर्ग ठाकर-ठाकूर समाज उत्कर्ष संस्था महा.राज्य (पुणे विभाग ) यांच्या संयुक्त विद्यमानाने पुणे जिल्हा परिषद सदस्या दिपाली काळे यांच्या हस्ते “ठाकर समाजमित्र” पुरस्काराने गौरविण्यात आले.

[amazon_link asins=’B078BNQ313,B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d01a9851-a53a-11e8-8280-2347b4bb87cd’]

बाबाजी पवळे हे आरटीआय कार्यकर्ते असून अगदी तरुण वयापासून सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत ते गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या गावातील आदिवासी समाजाच्या न्याय हक्कसाठी लढत असून त्यांना मार्गदर्शन करत आहेत तसेच त्यांनी सोशल मीडिया व पत्रकारितेच्या माध्यमातून आपल्या गावातील शौचालयाच्या बोगस नोंदी,कृषी अधिकारी यांच्यावर कारवाई करा,जिल्हा परिषद सदस्य शिफारस रद्द करा,दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करायला लावून अनेक समस्यांना वाचा फोडण्यासाठी नेहमीच  प्रयत्न केला आहे,अतिशय “निर्भीड” पने काम करणाऱ्या पवळे यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

यावेळी अग्निशामक दलाचे अधिकारी रमेश गांगड,संस्थेचे कार्याध्यक्ष नरेंद्र केदारी ,पुणे जिल्हा परिषद सदस्या दिपालिताई काळे ,गोरक्ष केदारी ,रितेश शिंदे,बिजली भालेकर यासह आदिवासी ,ठाकर व ठाकूर समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.