सोसायटीमधील रहिवाश्यांचा दारु विक्री दुकानास विरोध

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

पिंपरी येथील लिंक रोडवरील ओम साईराम कॉम्प्लेक्सला लागूनच असलेल्या बिल्डिंगमध्ये सुरु होत असलेल्या बिअर, वाईन शॉपच्या दुकानास ओम साईराम कॉम्प्लेक्सच्या रहिवाशांनी विरोध दर्शविला असून पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखीनिवेदनांद्वारे मागणी केली आहे.

दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, ओम साईराम कॉम्प्लेक्स येथे अर्जदाराच्या कुटुंबातील महिला व मुला-मुलीची ये-जा असते. याठिकाणी पहिली ते पंधरावीपर्यंतच्या वर्गातील मुला-मुलींची शिकविण्याची वेळ सकाळी ते रात्री नऊपर्यंत चालू असते. त्यामुळे तेथे पूर्णवेळ पहिली ते पंधरावीपर्यंत शिकणा-या वयोगटातील मुले-मुली ये जा सुरु असते. बाजूला बालवाडी असून तेथे महिला, पालक, लहान मुले यांचीही ये- जा सुरु असते. याच परिसरातील रमाबाई भाटनगर भागातील छोट्या मुलींवर बलात्कार करुन तिचा खून करण्यात आला.

त्यामुळे या सर्व परिसरात महिलांमध्ये लहान-मुलींमध्ये भीतीचे वातावरण असून याचठिकाणी बिअर वाईन शॉप सुरु झाल्यास धोका निर्माण होईल. याठिकाणी सुरु होणारे बिअर वॉईन शॉप सुरु होऊ देणार नाही, अन्यथा रहिवाशांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
[amazon_link asins=’B079Q64PW6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8529b5af-d22b-11e8-9177-ed82b465f701′]
वसतिगृहातून तीन मोबाईलची चोरी

मंचर : येथील शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृहातील विद्यार्थी रविंद्र मारुती दगडे यांच्या रुममधील तीन मोबाईल अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्याची घटना सोमवारी (दि. 15) पहाटे घडली. अज्ञात व्यक्तीच्या विरोधात मोबाईल चोरीचा गुन्हा मंचर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. शासकीय अदिवासी मुलांचे वसतिगृह मंचर येथे रुम नं. 101च्या उघडया दरवाजामधून 9 हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल फोन कोणीतरी अज्ञाताने चोरुन नेले. अज्ञात चोरट्याच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद रविंद्र दगडे यांनी दिली आहे. मंचर पोलीस ठाण्याचे कर्मचारी ए. बी. मडके. पुढील तपास करीत आहेत.

सहा संशयित महिला ताब्यात

शिर्डी : साई बाबांच्या दर्शनासाठी मंदिरात येणाऱ्या साईभक्तांना लुटण्याच्या उद्देशाने वावरणा-या सहा परप्रांतीय संशयित महिलांना बुधवारी पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. पोलीस सूत्रांची माहिती अशी की, शिर्डीत सध्या साई समाधी शताब्दी महोत्सवाचा सांगता समारंभ धुमधडाक्यात सुरू आहे. शताब्दी वर्षाच्या सांगतेला तीन दिवस उरलेले असताना साईभक्त मोठ्या संख्येने शहरात दाखल होत आहेत. साई मंदिरात दर्शनासाठी येणाºयांचे पैसे व दागिन्यांची चोरी करण्याच्या उद्देशाने काही महिला व पुरूष भक्त बनून फिरत होते. दुपारच्या सुमारास मंदिरातील सुरक्षा रक्षकांनी गुरूस्थान व मंदिर परिसरातूनआंध्रप्रदेश व तामिळनाडू राज्यातील सहा परप्रांतीय महिलांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरूध्द प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.