जरा हटके

काँग्रेसची ‘हि’ नगरसेविका घालते तब्बल १२५ तोळे सोनं

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन – नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे या १२५ तोळे सोने दागिने अंगावर घालून सर्वत्र फिरतात. श्रीदेवी जॉन फुलारे या काँग्रेसच्या सोलापूरमधील नगरसेविका आहेत. सध्या संपूर्ण सोलापुरात श्रीदेवी यांच्या १२५ तोळे सोन्याच्या दागिन्यांचीच चर्चा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या दागिन्यांची किंमत सुमारे ४५ लाख रुपये एवढी आहे.

श्रीदेवी फुलारे सोलापूर शहरातल्या रेल्वे लाईन कोनापूरे चाळ (प्रभाग क्रमांक १५) या भागाचा नगरसेविका आहेत. या भागातून त्या यापूर्वी दोन वेळा निवडून आल्या आहेत. श्रीदेवींचे पती जॉन फुलारे हे कोनापूरे चाळ भागात सामाजिक कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध आहेत.

सतरा वर्षांपूर्वी जॉन आणि श्रीदेवी यांचा प्रेमविवाह झाला. तुळजाभवानीच्या मंदिरात त्यांनी लग्न केले. दोघांचेही आई वडील गिरणी कामगार होते. जॉन यांनी अगोदर महानगरपालिकेची आणि नंतर विधानसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढविली आहे. परंतु या दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झाला होता. श्रीदेवी यांनी २००७ साली शिवसेनेच्या तिकिटावर महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती. परंतु तेव्हा त्यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला होता. त्यानंतर काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वात त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करुन पक्षासाठी काम केले. २०१२ आणि २०१७ साली काँग्रेसच्या तिकिटावर श्रीदेवी काँग्रेसच्या तिकिटावर महानगरपालिकेत निवडून आल्या.

फुलारे दाम्पत्यांना दोन मुले आहेत.५ फेब्रुवारी रोजी श्रीदेवी यांचा वाढदिवस होता. तेव्हा जॉन यांनी श्रीदेवी यांना वाढदिवसानिमित्त १२५ तोळे दागिन्यांची भेट दिली. जॉन हे कंत्राटदार आहेत. व्यवसायातून जमा झालेल्या पैशातून आपण हे १२५ तोळे सोने जीएसटी भरून आणि आयकर रिटर्न्स भरुन विकत घेतल्याचा जॉन यांचा दावा आहे.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या

Back to top button