एसपी शर्मा यांनी केली 50 किलोमीटरची सायकलिंग पूर्ण

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा व प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी अनुराग जैन यांनी आज सकाळी 50 किलोमीटरची सायकलिंग स्पर्धा पूर्ण केली. नगर-कल्याण रस्त्यावरील सायकलोत्थान स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

50 किलोमीटर व 100 किलोमीटर अशा दोन प्रकारात ही सायकलिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी अनुराग जैन या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. पोलीस अधीक्षक शर्मा व जैन या दोघांनी नगर ते वाघवाडी फाटा दरम्यान पन्नास किलोमीटर अंतर पूर्ण केले. 50 किलोमीटरचे अंतर पूर्ण केल्याबद्दल त्यांचा आयोजकांच्यावतीने सत्कार करण्यात आला.

शर्मा यांनी सुमारे पंधरा दिवसांपूर्वी नगर मॅरेथॉन स्पर्धेत 21 किलोमीटरचे अंतर धावून पूर्ण केले होते. दैनंदिन कामकाजाच्या ताणतणावातून वेळ काढून ते दररोज धावण्याचा व सायकलिंगचा वटसराव करतात. आज आयोजित करण्यात आलेल्या सायकलिंग स्पर्धेत त्यांनी 50 किलोमीटरचे अंतर पूर्ण केले.