मलायकाच्या ‘त्या’ पोस्ट वरून चर्चांना उधाण 

मुंबई : वृत्तसंस्था – अर्जुन आणि मलायका या दोघांच्या अफेअरच्या चर्चांना सध्या उधाण आले असून अद्याप त्यांनी आपल्या नात्याविषयी खुलासा केला नाही पण मलायकाची ताजी पोस्ट तर बरेच काही सांगणारी आहे. नुकतीच तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये मलायकाने एका व्हॅकेशनचा जुना फोटो शेअर केला. ‘मला परत घेऊन चल…,’असे कॅप्शन मलायकाने या पोस्टला दिलेआहे . मलायकाच्या या पोस्टवर अर्जुनने फार काही लिहिले नाही. केवळ ‘hmmm’ असे लिहिले. अर्जुनच्या या प्रतिक्रियेवरून तो मलायकाच्या बाबतीत फारच गंभीर असल्याचं बोललं जात आहे.

यानंतर अर्जुननेही आपला एक फोटो पोस्ट केला. ‘हॉलिडेवर चांगल्या पोझ ज्या. जेणेकरून परतल्यावर इन्स्टाग्रामवर शेअर करायला खूप सारे फोटो असतील,’असे त्याने लिहिले. त्याच्या व अर्जुनच्या या दोन्ही फोटोवरून एक गोष्ट स्पष्ट झाली. ती म्हणजे, दोघांचेही फोटो ‘मिलान’चे आहेत. होय, याच ठिकाणी अर्जुन व मलायका एकत्र व्हॅकेशनवर गेले होते. अर्थात हा व्हॅकेशन प्लान सीक्रेट होता.

अलीकडेच हे दोघे  संजय कपूर यांच्या न्यू ईअर पार्टीत हातात हात घालून दिसले होते. या पार्टीत मलायका व अर्जुन दोघांनीही हातात हात घालून एन्ट्री घेतली होती.इतकेच नाही तर एका फ्रेममध्ये अर्जुन मलायकाच्या खांद्यावर हात टाकून उभा असलेलाही दिसला होता.