म्हणून माझ्यासाठी खास आहे ‘गली बॉय’ – रणवीर सिंग 

मुंबई : वृत्तसंस्था – रणवीर सिंग आणि आलीय भट यांच्या ‘गली बॉय’ चित्रपटाचे धमाकेदार ट्रेलर नुकतेच प्रदर्शित झाले. आणि या चित्रपटाच्या ट्रेलरला सगळ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला या चित्रपटात रणवीर सिंग आणि आलीय भट ही जोडी पहिल्यांदा एकत्र पडद्यावर दिसणार आहे. रणवीर यात रॅपरची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचिंगवेळी रणवीरने अनेक गोष्टी शेअर केल्या. तसेच हा चित्रपट त्याच्या साठी का खास आहे याचा ही खुलासा केला.
या वेळी एका माध्यमाशी बोलताना रणवीर म्हणाला, की ‘गली बॉय’ या चित्रपटासाठीच मी जन्माला आलो आहे. जर माझ्याव्यतिरीक्त यात दुसऱ्या कुणाची भूमिका असती, तर मला खूप वाईट वाटले असते. मात्र, यातील भूमिका माझ्याशिवाय कोणीही चांगल्याप्रकारे साकारू शकले नसते. त्यामुळे मी या भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घेतली’.हा  चित्रपट माझ्यासाठी विशेष आहे कारण  यात रॅप, हिप-हॉप म्यूझिक आहे, जे मला लहानपणापासून आवडतं. विशेष म्हणजे हा चित्रपट माझी मातृभूमी मुंबईच्या पार्श्वभूमीवर बनलेला आहे’,असेही त्याने सांगितले.
या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचाही भरभरून प्रतिसाद दिला आहे असे दिसून येते.कारण सोशल मीडियावर यातील डायलॉग्सचे मिम्सही व्हायरल होत आहेत. यावरून प्रेक्षकांना ट्रेलर आवडल्याचा अंदाज येतो. १४ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.