सेंट उर्सुलाच्या शिक्षिकेने विद्यार्थ्यांला बेदम मारले

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – स्कुल बसमध्ये झालेल्या वादातून एका १३ वर्षाच्या मुलाला शिक्षिकेने बेदम मारहाण केल्याची घटना आकुर्डी येथील सेंट उर्सुला शाळेत घडली आहे. यामध्ये मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी सकाळी हा प्रकार घडला असून अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याऐवजी आपआपसात बोलून ठरवा असा सल्ला दिला असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.

हर्षल कांबळे (१३, रा. देहूरोड) याला मारहाण केली असून तो जखमी आहे. पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षल हा आकुर्डी येथील सेंट उर्सुला शाळेत शिक्षण घेत आहे. सोमवारी सकाळी नेहमी प्रमाणे तो बसमध्ये शाळेला येत होता. त्यावेळी तो येत असलेल्या बसमध्ये विद्यार्थांमध्ये भांडण झाली. याच बसमध्ये मारहाण करणाऱ्या शिक्षिकेचा मुलगा होता. शाळेत आल्यानंतर शिक्षिकेने हर्षल याला बेदम मारहाण केली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला मात्र याची माहिती दिली नाही.

हर्षल घरी आल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात आणले असता त्याला ऍडमिट करून घेतले आहे. निगडी येथ लोकमान्य हॉस्पिटल येथे ॲडमिट करण्यात आले आहे. मुलाला शिक्षकांनी केलेल्या मारहाणीत अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

याबाबत निगडी पोलिसांना विचारले असता सोमवारी शाळेत शिक्षिकेने विद्यार्थ्याला मारहाण केली असल्याची तक्रार नातेवाईक घेऊन आले होते. आम्ही या प्रकरणाची खातरजमा करत आहे. तसेच नातेवाईकांनी फक्त शिक्षिकेला समज द्या असे म्हटल्याने गुन्हा अद्याप दाखल झाला नसल्याचे सांगितले.

जाहिरात