तब्बल 20 कोटी प्रकाशवर्षे अंतरावरील ताऱ्याचा विस्फोट कॅमेऱ्यात कैद 

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – अमेरिकेतील संशोधकांनी पृथ्वीपासून तब्बल  20 कोटी प्रकाशवर्षे अंतरावरील एका तार्‍याच्या विस्फोटाची घटना यशस्वीपणे कॅमेर्‍यात कैद केली आहे. गेल्यावर्षीच 17 जूनला अ‍ॅटलस सर्व्हेच्या ट्विन टेलिस्कोपच्या सहाय्याने ही घटना कॅमेर्‍यात टिपण्यात आली होती व तिचा आतापर्यंत अभ्यास सुरू होता असा दावा नॉर्थवेस्टर्न युनिअंतरावरीलव्हर्सिटीतील संशोधकांनी केला आहे.
तार्‍याचा स्फोट होऊन त्याचे रूपांतर कृष्णविवरात किंवा न्यूट्रॉन तार्‍यात झाले असावे असे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे. संशोधकांच्या पथकाने ही घटना समजून घेण्यासाठी अनेक स्रोतांची मदत घेतली. त्यामध्ये तीक्ष्ण एक्स-रे आणि रेडिओ लहरींसारख्या गोष्टींचा समावेश होता.
याबाबत माहिती देताना सांगितले की, “नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीतील राफेला मार्गटी यांनी सांगितले की, ज्यावेळी एखाद्या तार्‍याचा मृत्यू होतो, त्यावेळी त्याचे रूपांतर कृष्णविवर किंवा न्यूट्रॉन तार्‍यामध्ये होत असते. तार्‍यामध्ये होणार्‍या विस्फोटाच्या घटनेला ‘सुपरनोव्हा’ असे म्हटले जाते. त्यानंतर या तार्‍यामधील घटक उत्सर्जित होऊन त्याचे रूपांतर प्रचंड आकर्षणशक्‍ती असलेल्या पोकळीत म्हणजे कृष्णविवरात होऊ शकते.”
अशा प्रकारच्या अनेक घटना शास्त्रज्ञांसाठी उपयोगी ठरणार आहे. अशा दुर्मीळ घटनेपासून खगोल शास्त्रज्ञांना ब्रह्मांडातील अनेक घटना व्यापक पद्धतीने समजण्यास मदत मिळणार आहे. याची विशेष मदत ही कृष्णविवरे किंवा न्यूट्रॉन तार्‍यांबाबत अधिक माहिती घेण्यासाठी होऊ शकते.