हेअर डाय लावतांना राहा सावध, नाहीतर तोंड होईल रताळ्या सारखे  

दिल्ली ; पोलीसनामा ऑनलाईन: केमिकल युक्त पदार्थ त्वचेवर लावल्याने त्वचेवर किती गंभीर परिणाम होऊ शकतो याचा आपण विचार ही करू शकत नाही भारतात बहुतांश लोकं खास करून महिला ही बाजारातून हेअर डाय आणून घरच्या घरी केसांना डाय करतात. मात्र एका १९ वर्षीय मुलीला घरच्या घरी हेअर डाय करणे चांगलेच महागात पडले आहे. या मुलीने केसाला डाय लावला, हा डाय तरुणीच्या त्वचेला सहन झाला नाही ज्यामुळे तिच्या चेहऱ्याच्या आणि डोक्याच्या त्वचेवर डायची अॅलर्जी झाली व तिचा चेहरा सुजला. तिचे कपाळ व चेहऱ्याजवळील काही भाग हा मूळ आकारमानापेक्षा दुपटीने वाढल्याने तिला श्वास घेण्यासही त्रास होत होता.
पॅरिस येथे राहणाऱ्या इस्टेलने बाजारातून हेअर डाय आणला होते. ते डाय लावल्यानंतर काही वेळातच तिला जळजळ सुरू झाली. मात्र तिला ते काही वेळासाठीच होत असेल असे वाटले. त्यामुळे काही वेळाने केस धुवून ती झोपली. दुसऱ्या दिवशी जेव्हा ती उठली तेव्हा तिचे कपाळ, डोळ्यांखालचा भाग, नाक व आजूबाजूचा भाग सुजला होता. इस्टेल ताबडतोब डॉक्टरांकडे गेली, यावेळी डॉक्टरांनी तिला डायचं मिश्रण बनवत असताना त्याचं प्रमाण चुकल्याने तिला अॅलर्जी झाल्याचे सांगितले.दरम्यान हे पूर्णपणे आधीसारखा होईल की नाही हे अजून ही सांगता येत नाही