क्राईम स्टोरी

तसले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत क्लास चालकाकडून विद्यार्थीनीचा लैंगिक छळ

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – नाशिकातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका खासगी क्लासचालकाने क्लासमधील एका विद्यार्थीनीचे आक्षेपार्ह फोटो काढत ते व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत संबंधित शिक्षकाविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सदर आरोपी शिक्षकाचे नाव अनिल अवचरे आहे. तर पीडित विद्यार्थीनी एकलहरे गावातील आहे. सदर विद्यार्थीनी  एका खासगी क्लासमध्ये इंग्रजी शिकण्यासाठी जात होती. अनिल अवचरे याचे पीडित विद्यार्थीनीच्या वडिलांशी घरचे संबंध होते. घरचे संबंध असल्याने अवचरे कायमच त्यांच्या घरी येत असे. एकदा घरी कोणी नाही हे पाहून अवचरे तेथे आला. त्याने दार बंद केले. अवचरे याने तिला चक्क तिच्या अंगावरील कपडे काढण्यास मजबूर केले. यावरही तो थांबला नाही तर पुढे त्याने तिचे अनेक आक्षेपार्ह फोटो माेबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केले. पुढे आणखीच धक्कादायक प्रकार केला. तो म्हणजे त्याने तिच्यावर बळजबरी केली. यानंतरही तो त्याने हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अनेकदा अत्याचार केला.
अनेकदा होणाऱ्या त्रासाला ती फार कंटाळली होती. एके दिवशी न राहवून पीडित मुलीने याबाबत तिच्या घरच्यांना सांगितले. यावेळी कुटुंबियांनी तात्काळ पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी संशयित अवचरे याच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पुढील तपास पोलिस करीत आहेत.
Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या