आत्मदहनाच्या इशार्‍याने विद्यापीठ प्रशासनाला जाग

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुणे विद्यापीठात विविध मागण्यांसाठी उपोषण सुरु करण्यात आले होते, मात्र उपोषणाबाबत गेल्या ३ दिवसांपासून प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नव्हती. म्हणून विध्यार्थ्याला चक्क आत्मदहनाचा इशारा द्यावा लागला.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’881084b3-cc94-11e8-a0ed-21b4fd2c6540′]

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे, विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या सर्व विध्यार्थ्यांना कमवा व शिका योजनेत प्रवेश देण्यात यावा, तसेच मागील वर्षी ज्याप्रमाणे विध्यार्थ्यांना तिसऱ्या वर्षी कमवा व शिका योजनेत प्रवेश दिला हाेता, त्याच प्रमाणे याही वर्षीही प्रवेश देण्यात यावा अश्या अनेक मागण्यांसाठी विद्यापीठातील विद्यार्थी विकास खंडागळे, प्रताप हरकळ, दयानंद शिंदे, विजय तळेगावकर , हनमंत कुसंगे, यांनी विद्यापीठाच्या अनिकेत कॅन्टीन परिसरात उपोषण सुरु केले होते.

मात्र गेल्या तीन दिवसांपासून या उपोषणाबाबत प्रशासनाकडून काेणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नव्हती. त्यामुळे उपोषणकर्ता विद्यार्थी विकास खंडागळे याने माझी तब्बेत खालावली आहे, मी आता वेदना सहन करू शकत नाही, म्हणून मी दि. १० आॅक्टोबर रोजी रात्री ८ वाजता आत्मदहन करणार आहे असे पत्र विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाकडे दिले होते, विद्यार्थी खंडागळे याच्या अश्या या आत्मदहनाच्या इशाऱ्याने अखेर विद्यापीठ प्रशासनाला जाग आली, आणि विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्याचे विद्यापीठाने आश्वासन दिले आहे.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a0dbb776-cc94-11e8-87ac-8ddc740b9b0d’]

विद्यार्थ्यांना स्वतःचा हक्क मागण्यासाठी उपोषण करावं लागत आहे, परंतु त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी स्वतःचा जीव पण धोक्यात टाकावा लागत आहे. मात्र आता आपला हक्क मिळवण्यासाठी उपोषण नाही तर आत्मदहनाचाच इशारा करावा लागणार आहे का ? असा प्रश्न विद्यापीठीतील विद्यार्थ्यांना निर्माण झाला आहे.