टीव्ही अभिनेत्याची गळफास घेऊन आत्महत्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबईतील ओशिवरा येथे राहत असलेल्या एका २८ वर्षीय टीव्ही अभिनेत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज (बुधवार) सकाळी घडली असून अभिनेत्याच्या आत्महत्येमुळे खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळाताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. राहुल दीक्षित असे आत्महत्या करणाऱ्या अभिनेत्याचे नाव आहे.

राहुल दीक्षित हा ओशिवरा येथे  राहतो. त्याने राहत्या घराच्या सिलिंग फॅनला गळफास घेत आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलीस याचा तपास करित असून याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

घटनास्थळी सुसाईट नोट सापडलेली नसून राहुलचे वडील महेश दीक्षित यांनी त्यांच्या फेसबुकवर इस दुनिया को क्यू छोड कर चला गया राहुल असा खेदजनक मेसेज पोस्ट केला आहे. यापूर्वीही अनेक बॉलिवूड तसेच टेलिव्हिजन कलाकारांनी आत्महत्या केल्या आहेत. वैयक्तिक किंवा कामाच्या ठिकाणी आलेल्या नैराश्यातून या आत्महत्या केल्या होत्या. राहुल दीक्षितने आत्महत्या का केली? याबाबत पोलिसांनी अधिक तपास सुरू आहे.

…म्हणून गांधी टोपी परिधान केली ; अजित पवारांनी दिलं स्पष्टीकरण