तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

भोकर : पाेलीसनामा ऑनलाईन (माधव मेकेवाड)-दोन वर्षापासून कर्ज बाजारी असलेल्या तरुणाला कर्ज आज फिटेल उद्या फिटेल म्हणून निसर्गाने साथ दिली तर शेतात माल पिकेल म्हणून निसर्गा कडे पाहणारा तरुण आज निघून गेला. ह्यावर गावकऱ्यांचा व त्याच्या परिवाराचा विश्वास बसत नाही.पदवीतर शिक्षण पूर्ण झाल्या नंतर  लग्न जमले त्यास दोन वर्षे ही हाेत नाही ताे या तरुण शेतकऱ्याने फाशी घेऊन स्वतः ची जीवन यात्रा संपवली. भोकरतालुक्यातील कोळगाव (बु) येथील तरुण शेतकरी असुन याेगेश विठ्ठलराल गायकवाड (वय ३०) याने आज दि.१७ नोव्हेंबर रोजी आत्महत्या केली आहे.

घटनेबाबत पोलिसांनी दिलेली थोडक्यात माहिती अशी की, मयत योगेश विठ्ठलराव गायकवाड वय ३० वर्ष रा.कोळगाव (बु) येथील रहिवासी असून त्यांच्या शेतातील सततच्या नापिकी आणि निसर्गाच्या अवकृपेने तो नेहमी नाराज असायचा त्यातच बँकेचे कर्ज फिटेनासे झाले, या नैराश्य भावनेतून त्यांनी आज सकाळी स्वताच्या शेतातील चिंचेच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली या आशयाची माहिती मयताचा भाऊ नामे प्रवीण गायकवाड यांनी भोकर पोलीस ठाण्यात दिल्यावरून पोलिसांनी अकस्मात मृत्यू ची नोंद घेतली आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.नवतरुण शेतकऱ्याने अश्या पद्धतीने आत्महत्या केली असल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.