सुजित आंबेकर यांना उत्कृष्ठ पत्रकारिता पुरस्कार जाहीर

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – सातारा नगर पालिकेच्या वतीने दिला जाणारा श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज उत्कृष्ठ पत्रकारिता पुरस्कार पत्रकार सुजित बाळकृष्ण आंबेकर यांना आज जाहीर करण्यात आला आहे.

आंबेकर हे सातारा जिल्ह्यातील लोकवृत्त न्यूज चॅनेलचे संपादक असून मराठी पत्रकार परिषदेचे पदाधिकारी आहेत. रोख रक्कम, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. एका खास समारंभात लवकरच हा पुरस्कार वितरित केला जाणार असल्याची माहिती नगरपालिका प्रशासनाने दिली आहे.

सुजित बाळकृष्ण आंबेकर हे मागील २० वर्ष ते पत्रकारितेत काम करत असून देश पातळीवरील NDTV, Times now, India news, sahara, bbc मराठी तसेच आंतराष्ट्रीय aljazeera वाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम पहात आहेत. त्यांनी पत्रकारांच्या राज्य पातळीवरील अनेक संघटनांमध्ये काम करत आहेत. सातारा जिल्हा नामदेव युवक संघटना स्थापना व अध्यक्ष म्हणून ही काम केले आहे. त्यांचे आजोबा वसंतराव व वडिल बाळासाहेब आंबेकर प्रमाणेच त्यांचा अनेक सामाजिक उपक्रमात सहभाग असतो.