नेटकऱ्यांना ‘स्लीपर सेल्फी’ ची सुपर भुरळ 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या सेल्फीचे वेड कुणाला नाही ? जो तो सेल्फी काढण्यात मग्न असतो. सध्याची तरुणाई तर सेल्फी प्रेमी तरुणाई आहे असं म्हंटलं तर काहीच वावगं ठरणार नाही. पण ज्यांच्याकडं मोबइलच नाही ते सेल्फी काढणार कुठून ? सेल्फीची हौस भागवण्यासाठी पाच चिमुरड्यांनी आपल्या पायातल्या स्लिपरलाच मोबाईल बनवला आणि सेल्फी ची पोज दिली. त्यांना हा खराखूरा सेल्फी जरी मिळाला नसला तरी त्याच्या चेहऱ्यावरील उत्सुकता आणि समाधान सेलिब्रेटींच्या सेल्फीला लाजवेल असेच आहे. हा ‘स्लीपर सेल्फी’ सोशल नेट्वर्किंग साईटवर भलताच व्हायर झाला आहे. भल्या भल्या सेलिब्रेटींना देखील या ‘स्लीपर सेल्फी’ ने भुरळ घातली आहे.

हा सेल्फी आला कुठून आणि कुणी घेतला आहे. याची माहिती मिळाली नसली तरी हा फोटो सोशलवर तुफान व्हायरल होत आहे. अनेकांची माने या सेल्फीने जिंकली आहेत. काही लोकांनी या फोटोला व्हाट्स अप स्टेट्स म्हणून देखील ठेवले आहे.

बमन इराणी
बॉलिवूडचे अभिनेते इराणी यांनी ‘आपल्या आनंदाची निवड आपणच करतो’ असं ट्विट केले आहे.

अमिताभ बच्चन
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन मात्र हा फोटो पाहून काहीसे भांबावले आहेत. तंत्रज्ञानाने केल्या जाणाऱ्या चापलुसीमुळे बिग बी काहीशी सावध प्रतिक्रिया देतात ‘संपूर्ण आदर आणि माफी मागत म्हणतो… मला वाटतं हा फोटोशॉप्ड आहे. ज्या हातात चप्पल आहे, तो हात शरीराच्या तुलनेने मोठा वाटतो.’ असं त्यांनी लिहिलं आहे.

अनुपम खेर
पहिल्यांदा या फोटोला अभिनेता अनुपम खेर यांनी शेअर केलं. त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर या फोटोला शेअर करत लिहिले की, “कुठलीही गोष्ट त्यांच्यासाठी सर्वोत्तम असते, ज्यांना ती सर्वोत्तम कशी बनवायची हे माहित असते.”

सुनील शेट्टी
अभिनेता सुनिल शेट्टीनेही हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिले की, “हा सुंदर फोटो तर मला शेअर करावाच लागेल, हॅपीनेस ट्रूली अ स्टेट ऑफ माईंड!!!”