मराठा क्रांती मोर्चातर्फे पोलिस अधीक्षक शर्मा यांचा सत्कार

सांगली : पाेलीसनामा ऑनलाईन

मराठा आरक्षणासाठी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक देण्यात आली होती. हा बंद शांतता, अहिंसेच्या मार्गाने करण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केले होते. या आंदोलनात पोलिस प्रशासनाने चांगले सहकार्य केल्याबद्दल पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांचा क्रांती मोर्चाच्या संयोजकांतर्फे गुरुवारी सत्कार करण्यात आला. आंदोलकांनीही अन्य जिल्ह्याच्या तुलनेत सांगली जिल्ह्यात शांततेने आंदोलन केल्याबद्दल शर्मा यांनी आंदोलकांचे आभार मानले.
[amazon_link asins=’B077Q19RF9′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1af43449-9bf3-11e8-b731-cf5e7946be87′]

गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्यात रस्ता रोको, धरणेसह विविध प्रकारची आंदोलने सातत्याने सुरू आहेत. किरकोळ अपवाद वगळता जिल्ह्यातील सर्व आंदोलने शांततेने झाली. गुरुवारी क्रांती मोर्चातर्फे महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते. सांगलीतील स्टेशन चौकात दिवसभर ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनात हजारो मराठा समाज बांधव सहभागी झाले होते. आंदोलनस्थळी पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी भेट देऊन पाहणी केली.
[amazon_link asins=’B077PWK5QD’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1f57402e-9bf3-11e8-96a3-45177e4428b1′]

यावेळी आंदोलनकर्त्यांनी संयम पाळत दिवसभरात जिल्ह्यात शांततेत बंद पाळून ठिय्या आंदोलन केल्याप्रकरणी अधीक्षक शर्मा यांनी आंदोलकांचे आभार मानले. तर आतापर्यंत झालेल्या आंदोलनात पोलिसांनी संयमाची भूमिका घेत आंदोलनकर्त्यांना सहकार्य केल्याप्रकरणी शर्मा यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. संजय पाटील, श्रीरंग पाटील, महेश खराडे, सतीश साखळकर, अंकित पाटील, प्रथमेश पाटील यांच्यासह मराठा समाज बांधव उपस्थित होते.