वैद्यकिय महाविद्यालयांच्या विरोधात मनविसेची सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका

पुणे : पाेलीसनामा ऑनलाईन

राज्यातील वैद्यकिय महाविद्यालयानी राखीव एन.आर.आय कोटीतील प्रवेश प्रक्रिया राबविताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे  उल्लघंन केले आहे. यामुळे राज्यातील सर्व वैद्यकिय महाविद्यालयांच्या विरोधात मनविसेचे शहर अध्यक्ष कल्पेश यादव यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’3c08a0e2-ce3f-11e8-b539-f5b4ee8805ff’]

राज्यातील वैद्यकिय महाविद्यालयांनी सन 2018-19 या शैक्षणिक वर्षामध्ये  राखीव एन आरआय कोटीतील प्रवेश प्रक्रिया राबविताना सर्वोच्य न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणेच या राखीव जागेतील प्रवेश करावेत अशी मागणी वैद्यकीय शिक्षण संचालकाकडे मनविसे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी केली होती.

या मागणीन्वये संचालकांनी सर्व महाविदयालय, अभिमत विद्यापीठांना स्पष्ट आदेश देवून या राखीव NRI जागेतील प्रवेश प्रक्रिया राबविताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे म्हणजे विद्यार्थी -पालक NRI असेल तर त्या विद्यार्थ्यास प्रथम प्राधान्य द्यावे अथवा विद्यार्थ्याचे नातेवाईक NRI असतील आणि हे नातेवाईक या विद्यार्थ्यांची संपुर्ण फी ही त्यांच्या NRI बॅंकखातेतुन स्पॉंसर करणार असतील तरच अशा विद्यार्थ्यांना या राखीव जागेतील जागेवर प्रवेश द्यावे असे स्पष्ट आदेश देवून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी तसेच शैक्षणिक वर्ष २०१७-१८  मधील राखीव जागेतील प्रवेशीत विद्यार्थ्यांची संपुर्ण तपशिलांसह माहिती संकेतस्थळावर प्रदर्शित करावे असे कळविले होते.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’52857749-ce3f-11e8-ac26-17ae1e652a95′]

तरी राज्यातील वैद्यकिय महाविद्यालयांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत भरमसाठ कॅपिटेशन  फी (डोनेशन )घेत इतर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला आहे. या प्रकरणी मनविसेचे पुणे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी वैद्यकिय महाविद्यालय आणि राज्य  शासनाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल करुन दाद मागितली आहे.
[amazon_link asins=’B079Q64PW6′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’587bf3e3-ce3f-11e8-9dc6-a52913e984c1′]

याबाबत कल्पेश यादव यांनी सांगितले की, वैद्यकिय महाविद्यालयांनी आर्थिक फायद्यासाठी राखीव एन.आर.आय कोट्यातून चुकीच्या पध्दतीने प्रवेश प्रक्रिया राबविली आहे. या प्रकरणी वैद्यकिय शिक्षण संचालयकांकडे दाद मागून ही काही उपयोग झाला नाही. या राखीव NRI जागेतील  सर्वोच्च न्यायालयाचे निर्देशाचे उल्लंघन करीत झालेले प्रवेश रद्द करावे यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली आहे. या राखीव NRI जागेतील प्रवेश रद्द झाल्यास राज्यातील विद्यार्थ्यांकरीता गुणवत्ता यादीनुसार प्रवेश प्रक्रिया राबविता येईल. यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल.