राजकीय

आमचे बॉस खूप स्ट्रीक्ट आहेत – सुप्रिया सुळे

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवावादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आमचे बॉस आहेत, असं म्हटलं आहे. त्या बिडकीन येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात त्या बोलत होत्या.

मेळाव्यात बोलताना त्यांनी माजी आमदार संजय वाघचौरे यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांना सुप्रिया सुळे यांनी तुमच्या तालुक्‍यातील बुथ कमिट्या झाल्या का ? असा प्रश्‍न विचारला, त्यावर ताई 80 टक्के झाल्या हे उत्तर आले. ते ऐकून शंभर का झाल्या नाही ? प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे आमचे बॉस खूप स्ट्रीक्‍ट आहेत. मी जेव्हा इथून जाईल तेव्हा ते मला विचारतील की तुम्ही रिकाम्या हाताने आलात का ?, असं त्यांनी यावेळी म्हटलं. त्यासोबत बुथ कमिट्या लवकर पूर्ण करण्याच्या सुचना पदाधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या. असं सांगून पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाचे पद आमच्यापेक्षा मोठे आहे, हे कार्यकर्त्यांच्या निदर्शनास त्यांनी आणून दिले.

मला पत्रकार नेहमी विचारतात की तुमची निवडणुकीची तयारी कशी सुरू आहे. माझे त्यांना एकच सांगणे आहे, राष्ट्रवादी पक्ष हा लोकांच्या सुखःदुखात धावून जाणारा आणि सतत लोकांमध्ये वावरणारा पक्ष आहे. त्यामुळे निवडणुका कधीही लागो आम्ही ट्‌वेन्टीफोर बाय सेव्हन तयार असतो. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत या तालुक्‍याचा आमदार राष्ट्रवादीचा असला पाहिजे. आमच्या पाच वर्षाच्या काळात तालुक्‍यात झालेली विकासकामे आणि आताच्या आमदाराने केलेली कामे याचे मुल्यमापन करा. मागच्या वेळी काय झाले याचा विचार करू नका. झाले गेले गंगेला मिळाले. आता तशी चूक पुन्हा होणार नाही’ असं त्यांनी म्हटलं. आगामी विधानसभा निवडणुकीत पैठणमधून पुन्हा माजी आमदार संजय वाघचौरे यांनाच उमेदवारी देणार असल्याचे संकेत सुप्रिया सुळे यांनी दिले आहेत. त्यामुळे उपस्थितांमध्ये वाघचौरे यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दिल्याची चर्चा रंगली होती.

दरम्यान, आधी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्लीला आला की सगळ्या जगाला माहित व्हायचं, मात्र आज मुख्यमंत्री कधी येतात आणि जातात हे कळत सुध्दा नाही. पुर्वी देशाच्या राजकारणात महाराष्ट्रला मानाचे स्थान होते. तेच मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी जोमाने कामाला लागा, असं आवाहनही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केलं.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या