‘या’ कारणांमुळे होत आहे सुप्रिया सुळेंच सर्वच स्तरातून कौतुक  

दौंड : (पुणे) पोलीसनामा ऑनलाईन – लोक प्रतिनिधी आपली जबाबदारी झटकून देतात  म्हणून अनेक सरकारी योजना जनतेपर्यंत पोहोचत नाहीत, तळागाळातील सर्वसामांन्य लोकांपर्यंत त्या योजना किंबहुना कित्येक वेळेस त्याची माहिती ही मिळत नाही. अनेकदा शासकीय योजना लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे जनतेपर्यंत पोहोचतच नसल्याचं चित्र पहायला मिळतं. मात्र, खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र शासनानं ज्येष्ठ नागरीकांसाठी सुरु केलेली वयोश्री योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याबरोबरच त्यांना जेवण वाढत त्यांची विचारपूस केली. इतकंच नव्हे, तर पंगतीत बसून जेवणाचा आस्वादही घेतला.

https://www.facebook.com/policenama/videos/756733028015786/

दौंड शहरातील उपजिल्हा रुग्णालयात खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात आली. या तपासणी शिबिरात दौंड तालुक्यातल्या गावोगावच्या ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली. या शिबिराला खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट देत सहभागी झालेल्या सर्वच ज्येष्ठ नागरिकांची विचारपूस केली.

 तेवढ्यावरच न थांबता सुप्रिया सुळे शिबीरस्थळी असलेल्या भोजनालयात जावून ज्येष्ठ नागरिकांना आपुलकीनं जेवणंही वाढलं. त्यानंतर त्या स्वतःही ज्येष्ठ नागरिकांसोबत जेवल्या आणि शिबिरार्थींसाठीच्या पंगतीत बसून जेवणाचा आस्वाद घेतला.
एरवी शासकीय योजनांच्या यशस्वीतेसाठी मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी केली जाते. मात्र तरीही त्या योजना गरजू घटकांपर्यंत पोहोचत नाहीत. मात्र दौंडमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून गावोगावी जनजागृती करुन ज्येष्ठ नागरीकांना वयोश्री योजनेत सामावून घेण्याचा प्रयत्न यशस्वी ठरलाय. आज झालेल्या तपासणी शिबिरात मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, खासदार सुप्रिया सुळे यांनी या शिबिराला भेट देत ज्येष्ठ नागरिकांची विचारपूस केली.
 आपण अनेकदा बघतो मुख्यमंत्री किंवा मंत्री मंडळातील अनेक मंत्री शाही जेवणाचा आस्वाद घेत अनेक फोटो वायरल झाल्याचं त्यावर चर्चा आपण ऐकत असतो परंतु दौंडमध्ये चक्क खासदारांनीच ज्येष्ठ नागरिकांना जेवण वाढत, त्यांच्यासोबतच जेवणाचा आस्वाद घेतल्यानं चर्चेचा विषय ठरलाय. त्याचवेळी योजना यशस्वी करायची असेल, तर नागरिकांशी तितकीच आपुलकी असली पाहिजे असंही बोललं जात आहे. सुप्रिया सुळेंच्या या कृतीचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.