क्राईम स्टोरी

टी सिरीजचे मालक भूषण कुमार वर लैंगिक शोषणाचा आरोप

मुंबई : वृत्तसंस्था – टी सीरिजचे मालक असलेले भूषण कुमार यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप झाला आहे. भूषण कुमार यांनी नोकरीचं आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्यांच्या सहकारी महिला कर्मचाऱ्यानं केला आहे. या प्रकरणी तिनं ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. मात्र अजून या प्रकरणात पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही एका महिलेनं चित्रपटात काम देण्यासाठी भूषण कुमार यांनी शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप केला होता. ‘मी चित्रपटसृष्टीत नवीन होते. त्यावेळी मी खूप घाबरले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मला चित्रपटातून काढून टाकण्यात आल्याची माहिती समजली,’ असं पीडित महिलेनं म्हटलं होतं. भूषण कुमार यांनी करिअर उद्ध्वस्त करुन टाकण्याची धमकी दिल्याचा आरोपही तिनं केला होता. हे सर्व आरोप कुमार यांनी फेटाळले होते. तसेच त्यांच्या पत्नीने ट्विट करत पती निर्दोष असल्याचे त्यावेळी सांगितले होते.
Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या