चक्क तहसीलदाराने चालविला अवैध वाळूचा ट्रॅक्टर

नांदेड : पोलीसनामा ऑनलाईन – पैनगंगा नदी पात्रात विदर्भ मराठवाडा सीमे वरूण ट्रॅक्टर द्वारे वाळूची चोरी होत होती दरम्यान या घटनेची माहिती  तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान विदर्भातील एक ट्रॅक्‍टर नदी पात्रात पकडला मात्र चालक तेथून पळून गेला. त्यावेळी वाळूने भरलेला ट्रॅक्टर स्वता: तहसीलदारांनी चालवत तहसील कार्यालयात आणून जमा केल्याची घटना पाहायला मिळाली आहे.
माहूर तालुक्यात पैनगंगा नावाचा ४२ किमी लांबीचे नदीपात्र आहे. या नदीपात्रात वाळू उपसा करण्यासाठी धक्का सुरु झाला आहे या पैकी चार घाटांना पर्यावरण विभागाने बंदी घातल्याने लिलाव प्रक्रियेतून वगळण्यात आलेले आहे उर्वरित घाटांची लिलाव होणे बाकी असल्याने विदर्भ सीमेवरून वाळू तस्कर ट्रॅक्टर टिप्पर द्वारे अधिकारी नसल्याचे संधी साधून वाळू तस्करी चालू असते . असाच एक प्रकार माहूर तहसीलदार सिद्धेश्वर वरनगावकर यांना कळला. दरम्यान शासकीय वाहन न वापरता खाजगी वाहनाने पोलिसांना सोबत घेऊन पेनगंगा नदी पत्रावरील मौजे टाळकी व कवठा या घाटावर पाळत ठेवली तब्बल दोन तासानंतर विदर्भ सीमेवरील कवठा या गावाच्या दिशेकडुण अनधिकृत रित्या तयार केलेल्या रस्त्यावरून एक ट्रॅक्‍टर नदीपात्रात येताना दिसले त्यावर पाळत ठेवीत ट्रॅक्टर हा मराठवाडा हद्दीतील वाळू घाटावर वाळू भरत असताना तहसीलदार व पोलीस यांनी त्या ट्रॅक्टरच्या दिशेने धाव घेतली. मात्र मजुर व ट्रॅक्टर ड्रायव्हर ट्रॅक्टर सोडून पळून गेले.
विशेष म्हणजे ट्रॅक्टर ड्रायव्हर ट्रॅक्टर सोडून पळून गेल्याने तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी ते वाळूने भरलेले ट्रॅक्टर स्वता: चालवत तहसील कार्यालयात नेले. यामुळे रेती वाहतूक करणाऱ्या तस्करांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. एन.के.जे.डब्ल्यू ०१२५० हा पकडण्यात आलेला ट्रॅक्टर चा वाहन क्रमांक आहे.