शिक्षण अधिकारी कार्यालयात शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न

बीड : पोलीसनामा ऑनलाईन 

बीड येथे राहणाऱ्या एका शिक्षकाने  शिक्षण अधिकाऱ्याच्या कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे खळबळ एकच उडाली आहे. विलास वामन गुरव (४५) असे या शिक्षकाचे नाव असून ते सुभद्रा बाई माध्यमिक विद्यालय , तगाडगाव , तालुका शिरूर जिल्हा बीड या शाळेत अध्यापनाचे काम करतात. त्यांनी या शिक्षण संस्थेतील सचिवांवर तसेच त्यांच्या कुटुंबियांवर मानसिक छळाचा आरोप केला आहे. आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास शिक्षण अधिकारी बीड येथे विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न गुरव यांनी केला. सुदैवाने त्यांना काेणतीही हानी झाली नाही.
[amazon_link asins=’B07B1B5CVK’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’47969cae-c321-11e8-bbfc-e1eb6e056e5d’]

मिळालेल्या माहितीनुसार, गुरव हे सुभद्रा बाई माध्यमिक विद्यालयात १९९९ पासून काम करतात. दरम्यान शिक्षण संस्थेच्या सचिव सुलोचना सानप त्यांचे पती सर्जेराव सानप, हणमंत सानप, चंद्रसेन सानप असे सानप कुटुंबावर गुरव यांनी मानसिक छळ केल्याचे आरोप केले आहेत. आरोपांमध्ये गुरव म्हणाले की इतकी वर्ष काम करून देखील त्यांना शिक्षक म्हणून मान्यता दिली गेलेली  नाही. या शाळेला शासनाचे अनुदान नव्हते. पण आता शासनाने अनुदान मान्य केले आहे. तरीही  शिक्षकांच्या यादीत माझे नाव जाणीवपूर्वक दिले जात नाही. तसेच गेल्या तीन वर्षाचा पगार मला कोर्टाने मान्य केला असला तरी तो अद्याप  दिला गेला नाही. मी शिक्षणाव्यतिरिक्त कीर्तन करण्याचे काम करतो आता माझा यातून थोडाफार गुजारा होतो. पण आता घर चालवणे अवघड झाले आहे. मला माझ्या मुलाचे शिक्षण पूर्ण करायचे आहे.  अशी खंत गुरव यांनी व्यक्त केली. या सगळ्याला वैतागून  त्यांनी बीड येथील शिक्षण अधिकाऱ्यांच्या कार्यालयात विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4ca74da7-c321-11e8-b5c7-71379402ea07′]

तसेच संस्थेचे सचिव आणि त्यांचे कुटुंबीय यांचेकडून त्यांना धमक्या येत असल्याचे देखील गुरव यांनी सांगितले. याच बरोबर त्यांना या संस्थेत शिक्षक म्हणून कायम करावे. थकवला गेलेला पगार देण्यात  यावा अशी  मागणी गुरव यांनी केली  आहे.

पोलीस अधिकारी, कर्मचारी आयुष्यभरात १५ वर्षे करतात जादा काम