‘या’ पासवर्ड हॅकच्या यादी… तुम्ही तर नाही ना ?

वृत्तसंस्था – आपण अनेकदा आपल्या लक्षात राहावेत म्हणून अगदी सोपे सोपे पासवर्ड ठेवतो. परंतु हे पासवर्ड बऱ्याचदा हॅक झाल्याच्याही घटना समोर येतात. तुम्हाला माहीत आहे का की, २०१८ मध्ये कोणता पासवर्ड सर्वात जास्त हॅक झाला आहे ? नक्कीच माहीत नसेल. परंतु आता आपण माहिती घेणार आहोत की, हा सर्वात जास्त हॅक होणारा पासवर्ड नेमका आहे तरी कोणता. कारण आता २०१८ मध्ये सर्वात जास्त हॅक झालेल्या पासवर्डचा खुलासा झाल्याचे समोर आले आहे. क केल्या गेलेल्या पासवर्डच्या यादीत १२३४५६ हे आकडे सर्वात वर आहेत. तर Password हा शब्द दुसऱ्या क्रमांकावर होता.

दरम्यान सायबर सिक्युरिटी संस्था स्प्लॅशडेटाने या हॅक झालेल्या पासवर्डबाबत खुलासा केल्याचे समजत आहे. दरम्यान  हॅक केल्या गेलेल्या पासवर्डच्या यादीत १२३४५६ हे आकडे आणि Password  हे दोन्ही पासवर्ड टॉपवर असण्याचं हे लगातार पाचवं वर्ष असल्याचंही समजत आहे.

अनेक लोक आपल्या पासवर्डला घेऊन खूपच निष्काळजीपणा करतात आणि तो सहजपणे लक्षात येईल असा सेट करतात. तर काही लोक खूपच जागरूक असल्याचं पाहायला मिळतं. सिक्युरिटी रिसर्चर्स सतत पासवर्डबाबत इशारा देत असतात. तरीही सुद्धा जगभरात लाखो लोक त्यांच्या ई-मेल, स्मार्टफोन, लॅपटॉप, कम्प्युटर आणि दुसऱ्या डिव्हायसेसना सुरक्षित करण्यासाठी कमजोर पासवर्ड ठेवतात अशी माहिती समोर आली आहे. सायबर सिक्युरिटी संस्था स्प्लॅशडेटा सहजपणे हॅक केल्या जाणाऱ्या लाखो पासवर्डचं विश्लेषण करते. मुख्य म्हणजे  स्प्लॅशडेटाचा रिसर्च हा हॅक झालेल्या ५० लाख अकाऊंटवर आधारित आहे.

स्प्लॅशडेटा या संस्थेने हॅक झालेल्या पासवर्डसोबतच २०१८ च्या २५ सर्वात खराब पासवर्डची माहितीदेखील जाहीर केली आहे.  रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, गेल्या वर्षभरात जगभरातील १० टक्के लोकांनी पुढील सर्वात खराब पासवर्डपैकी एकाचा वापर केला आहे. जाणून घेऊयात कोणते आहेत ते खराब पासवर्ड.

२५ सर्वात ‘खराब’ पासवर्ड

स्प्लॅशडेटा या संस्थेने जाहीर केलेल्या खराब पासवर्डच्या यादीत १२३४५६ आणि Password नंतर तिसऱ्या क्रमांकावर १२३४५६७८९ हा क्रमांक असल्याचं निदर्शनास आलं आहे. याचबरोबर  चौथ्या क्रमांकावर १२३४५६७८, पाचव्या क्रमांकावर १२३४५, सहाव्या क्रमांकावर ११११११, सातव्या क्रमांकावर १२३४५६७ हे पासवर्ड आहेत. त्यासोबतच सर्वात खराब २५ पासवर्डच्या यादीत sunshine, qwerty, iloveyou, princess, admin, welcome, 666666, abc123, football, 123123, monkey, 654321, !@#$%^&*, charlie, aa123456, donald, password1 आणि qwerty123 यांचा समावेश आहे.

दरम्यान सायबर सिक्युरिटी संस्थेने सूचना केली आहे की, यूजरने वेगवेगळ्या लॉग-इनसाठी वेगवेगळा पासवर्डचा वापर करावा. अशात हॅकर्स तुमचं अकाऊंट हॅक करणं कठीण होतं.