कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामासाठी १४९ कोटी रुपयांच्या निविदा मंजूर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

पुणे महानगरपालिकेच्या स्टँडिंग कमिटीकडून कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामासाठी प्रशासनाने स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवलेली १४९ कोटी रुपयांच्या निविदेला स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

कात्रज-कोंढवा बाह्यवळण रस्त्याच्या दुतर्फा लोकवस्ती वाढल्यामुळे वाहनांच्यासंख्येत ही मोठी वाढ झाली आहे. वाढत्या वाहन संख्येमुळे सातत्याने वाहतुकीची कोंडी आणि अपघात होत आहेत. त्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण व्हावे, अशी नागरिकांची मागणी सुरू झाली होती. त्याला अनुसरून पहिल्या टप्प्यात राजस सोसायटीपासून कोढवा येथील खडी मशिनमार्गे पिसोळी येथील महापालिकेच्या हद्दीपर्यंत ८४ मीटर रुंद विकास आराखड्यातील रस्त्याची आखणी करण्यात आली आहे.

या रस्त्याच्या कामासाठी पटेल इस्टेट रोड या मुंबईतील कंपनीने पालिका प्रशासनाने प्रस्तावित केलेल्या दराच्या २२.३० टक्के कमी दराने १४९ कोटी ५२ लाख रुपयांची निविदा भरली होती. निविदा प्रकियेत ही एकच कंपनी सहभागी झाली होती. या कंपनीबरोबर करार करण्यास व कामासाठी कमी पडणार्‍या आर्थिक तरतुदीसाठी पथ विभाग व प्रकल्प विभागाकडील अखर्चित रकमेचे वर्गीकरण करण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना देण्यास स्थायी समितीने मान्यता दिली.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4bb28042-c0d0-11e8-a4e0-ebd152fe6619′]

असा असेल कामाचा आराखडा 

कात्रज चौक ते सासवड फाटा हा रस्ता १९८१ पासून प्रादेशिक विकास योजना आराखड्यानुसार ८४ मीटर रुंदीचा प्रस्तावित असून या रस्त्याची एकूण लांबी १२.१ किलोमीटर आहे. राष्ट्रीय महामार्ग ४ पुणे बंगळूर रस्ता व राष्ट्रीय महामार्ग ९ पुणे सोलापूर रस्ता यांना जोडणारा मार्ग म्हणून घोषणा करण्यात आली.

या रस्त्यापैकी पुणे मनपा विकास आराखड्यात कात्रज-कोंढवा रस्त हा ६० मीटर मुख्य रस्ता व दोन्ही बाजून १२ मीटर सर्व्हिस रस्ता असा एकूण ८४ मीटर रुंदीने दाखविण्यात आला आहे. हा रस्ता मुंबईकडून बंगळूरकडे पुण्याहून जात असताना बाह्य वळणावर येतो.
अस्तित्वातील रस्ता सर्वसाधारणपणे १० ते १५ मीटर रूंदीचा असून रस्त्याच्या दोन्ही बाजूस पावसाळ्याच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी पर्जन्यवाहिन्या नसल्याने व प्रचंड वाहतूक असल्याने खराब होतात. दरदिवशी पंचावन्न हजार वाहने या रस्त्याने वाहतुक करतात.
राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक शहरात न येता परस्पर बाहेरील स्वतंत्र रस्त्यामार्ङ्गत नेण्याचे नियोजन असल्यामुळे कात्रज चौक-खडीमधीन चौक-उंड्री पिसोळी-सासवड रस्ता ते सोलापूर रस्ता या रस्त्यांचे स्वतंत्र नियोजन करून शहरातील मुख्य रस्त्यांचे बाजूने सर्व्हिस रस्ते इत्यादी बाबींचा भविष्यामध्ये समावेश केल्याने वाहतुक अधिक सुरक्षित होणार आहे.

[amazon_link asins=’B0756Z53JN,B0756Z43QS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d8ccac77-c0d1-11e8-9014-0132259cb99c’]

विनयभंग प्रकरण : ‘त्या’ सहायक पोलीस निरीक्षकाला (API) नियंत्रण कक्षाशी केले संलग्न
रस्त्याच्या मध्यभागी १.२० मीटर रूंदीचे दुभाजक, सहा पदरी मुख्य रस्ता, दोन्ही बाजूला साडेसात मीटरचे सेवा रस्ते, पाच मीटरचा रिफ्यूज एरिआ, सेवा रस्त्याच्या बाजूला पाच मीटर रूंदीचे पार्किंग, सेवा वाहिन्यासाठी तीन मीटर रूंदीची जागा, दोन्ही बाजूला प्रत्येकी तीन मीटर रूंदीचे सायकल ट्रॅक व पदपथ प्रस्तावित करण्यात आले आहेत. वृक्षांच्या पुर्नलागवडीसाठी ४.४० मीटरची जागा राखून ठेवण्यात आली आहे. या रस्त्यावर पेट्रोल पंप, गोकुळनगर चौक येथे भुयारी मार्ग, शत्रुंजय चौक, टिळेकर नगर येथे सेपरेटर प्रस्तावित करण्यात आले आहेत. नाल्यावर २० मीटर लांबीचा पुल बांधण्यात येणार आहे.

या रस्त्यासाठी ३५०० मीटर लांबीचे व ८४ मीटर रुंदीचे एकूण २ लाख ९४ हजार चौरस मीटर जागेच्या उपलब्धतेनुसार काम करावे लागणार आहे. त्यापैकी सुमारे ४० टक्के जागा मनपाचे ताब्यात आहे. उर्वरीत जागा ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे. याबाबत पथ विभागाचा संबंधित विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे.

पुणे : अकरा नव्या गावांचा विकास आराखडा करण्यासाठी गोखले इन्स्टिट्यूटची नेमणूक

[amazon_link asins=’B014CLL3KS,B06ZZB71TB’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’e0be8424-c0d1-11e8-8f40-4d820e4a3d70′]