ताज्या बातम्या

केमिकल कारखान्यात स्फोट; तीन गंभीर जखमी

बोईसर : पोलीसनामा ऑनलाईन – बोईसर एमआयडीसीमधील ई झोनमध्ये असलेल्या ‘साळवी केमिकल इंडस्ट्रीज लि.’ या रासायनिक कारखान्यात स्फोट होऊन आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत तीन कामगार गंभीर भाजले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या तीनही कामगारांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. स्फोटामुळे कारखान्याला आग लागल्याचे समजत आहे.

नेमके काय घडले ?
एमआयडीसी ई झोनमधील प्लॉट नम्बर ९३ मध्ये साळवी केमिकल इंडस्ट्रीज हा कारखाना आहे. पहाटेच्या सुमारास ‘क्लोरो हायड्रोक्सि क्युनिलिन(CHQ ) प्रॉडक्टला मिथिनॉलने धुवून स्वच्छ करून ड्राय करण्याचे काम चालू होते,. काम संपल्यानंतर ड्रायर बंद करण्यात आले. यानंतर स्फोट होऊन आग लागली. या आगीत कारखान्यातील तीन कामगार गंभीर जखमी झाले आहेत.

या घटनेनंतर गंभीर भाजलेल्या कामगारांना बोईसर येथील विकास हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर कारखान्यातील इतर कामगारांना नाक, डोळे जळजळण्याचा त्रास झाला. अग्निशमन दलाच्या पाच गाड्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. या कारखान्यात कंत्राटदाराकडून अकुशल कामगाराकडून काम करून घेण्यात येत असल्याची चर्चा सुरू होती.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या

Back to top button