ऑनड्युटी तंबाखू सेवनाने पोलिसाला तीन हजार रुपये दंड 

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – कळवा  परिसरात ऑनड्युटी असताना तंबाखू सेवनाने  सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक याला तीन हजार रुपये दंड भरण्याची वेळ आली आहे. सुनील कदम असे या पोलिसाचे नाव आहे उपायुक्त अमित काळे यांनीही  कारवाई केली आहे.२९ सप्टेंबर रोजी अमित काळे हे कळवा परिसरात पेट्रोलिंग करत होते . या वेळी त्यांना सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक कदम हे ऑनड्युटी असताना  तंबाखू खातअसताना  दिसले
या प्रकरणी कदम यांना  नोटीस बजावण्यात आली होती यावर  त्यांनी हात धुवत असल्याचे सांगितले  परंतु हात धुणे आणि तंबाखू चोळणे यात फरक असतो आणि तो फरक लक्ष्यात येतो त्यामुळे त्यांचा  हा खुलासा नामंजूर करण्यात आला .
 या प्रकरणी कदम यांना  तीन हजाराचा दंड कळवा उपविभागाकडून करण्यात आला होता. त्यानुसार काळे यांनी ही  दंडात्मक कारवाई केली. या कारवाई विरोधात संबंधित कर्मचारी पोलिस महासंचालकांकडे ६० दिवसांमध्ये अपील करू शकतात, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.