‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’मधील ८० टक्के दावे खोटे’

मुंबई : वृत्तसंस्था – माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम के नारायणन ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर: द मेकिंग अँड अनमेकिंग ऑफ मनमोहन सिंग’ चित्रपटावर टीका केली आहे. याबाबत बोलताना त्यांनी ‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटातील ८० टक्के दावे खोटे असल्याचं म्हटलं आहे. इतकेच नाही तर, नारायणन यांनी या वादग्रस्त पुस्तकाचे लेखक संजय बारू यांच्यावरही टीका केल्याचे समोर आले आहे. ‘माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे माध्यम सल्लागार असलेले बारू यांची क्षमताच नव्हती. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी पैसे कमावण्यासाठी हे पुस्तक लिहिले होते’ असा आरोप नारायणन यांनी केला आहे.
भारत चेंबर ऑफ कॉमर्स येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते उपस्थितांना संबाेधित करत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “सरकारमध्ये त्यांचे तेवढे मोठे पद नव्हते तसेच त्यांना महत्त्वही नव्हते. माध्यम सल्लागार म्हणून त्यांचे काम ही चांगले नव्हते. यूपीएचे सरकार पुन्हा येईल, असे त्यांना वाटले नाही. त्यामुळेच ते २००८ मध्ये गेले. “भारत-अमेरिका अण्वस्त्र करारात नारायणन यांची महत्वाची भूमिका होती.
या चित्रपटावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला होता. त्या म्हणाल्या होत्या की, “जर अ‍ॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टरवर चित्रपट आला आहे, तर आता डिझास्टर्स प्राइम मिनिस्टरवरही चित्रपट बनला पाहिजे. “याशिवाय,  ‘तो चित्रपट भविष्यात तयार होईल’ असेही त्या म्हणाल्या होत्या.
महत्त्वाचे म्हणजे चित्रपटात दाखवण्यात आलेले मनमोहन सिंग यांनी काँग्रेसवर निशाणा साधल्याचे दिसून आले. परिणामी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून चित्रपटगृहांची तोडफोड करत असतानाचे फोटो ट्विटरवर शेअर केलेले दिसून आले होते.