‘द ॲक्‍सिडेंटल प्राईम मिनिस्‍टर’ इंटरनेटवर लिक 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ट्रेलर रिलीज झाल्यापासून चर्चेत असलेल्या भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्‍या आयुष्‍यावर लिहिण्‍यात आलेल्‍या पुस्‍तकावर (लेखक – संजय बारू) आधारित ‘द ॲक्‍सिडेंटल प्राईम मिनिस्‍टर’ या चित्रपटाच्या रिलीज नंतर आता हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून अवघ्या तीनच दिवसात इंटरनेटवर लिक  झाल्याची माहिती मिळते आहे. देशातील विविध भाषांमध्ये हा सिनेमा करण्यात आला आहे. यातील सिनेमाचे पाइरेटेड वर्जन लिक झाले आहे.

‘द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर’ या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून हा सिनेमा खूप चर्चेत आहे. हा सिनेमा देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळावर आधारित आहे. या सिनेमात अभिनेता अनुपम खेर मुख्य भूमिका साकारत आहे. हा सिनेमा ‘द एक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर’ हा सिनेमा लेखक आणि मीडिया सल्लागार संजय बारू यांच्या पुस्तकावर आधारित आहे. विजय रत्नाकर गुट्टे या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहे. हा सिनेमा ११ जानेवारी रोजी प्रदर्शित होत आहे.

युपीए २ मधील डॉ. मनमोहन सिंग यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. या काळात सरकारवर विविध भ्रष्टाचाराचे आरोपही झाले होते. त्याचबरोबर गांधी कुटुंबियांचे सरकारवर असलेले नियंत्रणही वादग्रस्त ठरले होते. त्यातच आता लोकसभेची निवडणूक तीन महिन्यांवर आली असताना हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येत असल्याने काँग्रेसच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यावर आक्षेप घेतला आहे. हा चित्रपट आधी आम्हाला दाखविण्यात यावा आणि मगच प्रदर्शित केला जावा, अशीही मागणी काही नेत्यांनी केली होती. डॉ. मनमोहन सिंग यांचे माजी माध्यम सल्लागार संजय बारू यांनी लिहिलेल्या पुस्तकावर हा चित्रपट आधारित आहे.

सुधीर ओझा यांनी आपल्या याचिकेत केलेल्या तक्रारीनुसार, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि त्यांचे मीडिया सल्लागार संजय बारु यांची भूमिका निभावत अनुपम खेर आणि अक्षय खन्ना यांनी त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवला आहे. यामुळे मला आणि अनेकांना वाईट वाटलं असल्याचंही त्यांनी याचिकेत म्हटलं आहे. तक्रारीत त्यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका वड्रा यांच्याही प्रतिमेला धक्का लावण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्मात्यां विरोधातही तक्रार करण्यात आली आहे.ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर आणि अन्य १३ जणांवर एफआयआर दाखल करण्याचे आदेश उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमधील स्थानिक न्यायालयाने दिले आहेत.

तामिळ रॉकर्स  (Tamilrockers) या वेबसाईटवर हा सिनेमा लिक झाला आहे. सिनेमा प्रदर्शित झाल्‍यापासून तिनच दिवसात लिक झाल्‍यामुळे बॉक्‍स ऑफिसवर चांगलेच नुकसान होण्याची शक्‍यता आहे.

दरम्‍यान, या वेबसाईटवरुन लिक होणारा हा पहिला सिनेमा नसून याआधीही अनेक सिनेमे लिक झाले आहेत. यात रजीकांत यांचा ‘पेट्टा’, अमिताभ बच्चन आणि अमिर खान यांचा ‘ठग्‍स ऑफ हिन्दोस्‍तान’, रनबीर कूपरचा ‘संजू’ यासह अनेक सिनेमे प्रदर्शित होण्याच्या काही तासातच लिक झाले आहेत. या साईटवर बंदी घालण्यात आली आहे. परंतु, याच साईटवरुन दुसऱ्या डोमेनचा वापर करुन सिनेमे लिक होत आहेत.