सामन्याचे मैदान ठरले ; युती आघाडीची अशी असणार लढत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आगामी लोकसभा निवडणुकीला अल्पअवकाश राहिला असताना राज्यातील लढतीचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. राज्यात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी ,भाजप विरुध्द काँग्रेस, शिवसेना विरुद्ध काँग्रेस आणि भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशा चार लढती पाहण्यास मिळणार आहेत. भाजप शिवसेना युती झाल्यामुळे तसेच काँग्रेस आघाडी झाल्यामुळे या लढती स्पष्ट झाल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हि लढतीची समीकरणे समोर आली आहेत.

महाराष्ट्रात १७ मतदारसंघात भाजप विरोधात काँग्रेस लढणार आहे. तर १२ मतदारसंघात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. गत निवडणुकीत भाजप सेना युतीने राज्यातील ४२ जागा जिंकल्या होत्या तर या वेळी ४५ जागा जिंकण्याचा संकल्प भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे. तर त्यांच्या या विधानावर शरद पवार यांनी भाजपला कोपरखिळ्या मारल्या आहेत.

भाजप विरुद्ध काँग्रेस मतदारसंघ
सांगली, लातूर, नंदुरबार, अकोला, वर्धा, धुळे, नागपूर, नांदेड, गडचिरोली, चंद्रपूर, जालना, भिवंडी, दक्षिण मुंबई, सोलापूर, उत्तर मुंबई, पुणे, उत्तर मध्य मुंबई

शिवसेना विरुद्ध काँग्रेस मतदारसंघ
यवतमाळ-वाशिम, हिंगोली, रामटेक, दक्षिण मध्य मुंबई, शिर्डी, औरंगाबाद, पालघर, मुंबई उत्तर-पश्चिम, रत्नागिरी

शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी मतदारसंघ
कोल्हापूर, नाशिक, सातारा, मावळ, परभणी, शिरुर, अमरावती, रायगड, बुलढाणा, उस्मानाबाद, कोल्हापूर, कल्याण, ठाणे

भाजप विरुद्ध राष्ट्रवादी मतदारसंघ
अहमदनगर, दिंडोरी, जळगाव, रावेर, भंडारा-गोंदिया, बीड,ईशान्य मुंबई,माढा

अशा या लढती रंगणार आहेत. या मतदारसांघात उमेदवार कोण असणार आहेत याबद्दल चित्र देखील स्पष्ट झाले आहे. मात्र त्यास युती आणि आघाडी कडून अधिकृत दुजोरा मिळणे बाकी आहे. लोकसभेची निवडणूक मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घोषित होण्याची दाट शक्यता असल्याने राज्यात युती आणि आघाडी जोरदार कामाला लागली आहे.