‘बुलेट’चा आवाज काढणाऱ्यांचा ‘अव्वाज’ बंद

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – शाळा, कॉलेज समोर टवाळख्या करणारे आणि बुलेट सारख्या दुचाकीचे सायलन्सर बदलून मोठा, छातीत धडकी भरणारा आवाज काढणाऱ्या टवाळखोरांवर निगडी पोलिसांनी कारवाई केली आहे. या टवाळखोरांचा आवाज बंद केला आहे.

शाळा, कॉलेज समोर टवाळख्या करणाऱ्यांवर यापूर्वीही पोलिसांनी अनेकदा कारवाई केली आहे. शाळा, कॉलेज समोर वाहनांवर बसून येणाऱ्या जाणाऱ्याविद्यार्थींनीची छेडछाड केली जाते. अश्लील कमेंट केले जातात. यातून काही वेळा दोन गटात भांडणे झाले आहेत. याच सोबत पालकांच्या लाडात वाढलेल्याना लाखो रुपयांच्या दुचाकी देण्यात आल्या आहेत. यातिल बुलेट असणारे आणखी हुलडबाजी करत असतात. बुलेटचे सायलन्सर बदलून मोठ्या आवाजाचे बसविण्यात आले आहेत. यामुळे अनेकानायाचा त्रास होत आहे. रुग्ण, वृध्द यांच्या सोबत मुलींना त्रास दिला जात आहे.

निगडीचे वरिस्ठ निरीक्षक अमरनाथ वाघमोडे आणि त्यांच्या पथकाने आज सकाळ पासून त्यांच्या हड्डीतील शाळा, कॉलेज समोर करवाईचा बडग़ा उचलला. मोठा आवाज करणाऱ्या 10 बुलेट जप्त केल्या असून चालकांवर वाहतूक नियमांनुसार करवाई केली आहे. अल्पवयीन मुलांच्या पालकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. यापुढेही अशीच कारवाई सुरु राहणार आहे. निगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत कोणी अशा प्रकारे बुलेट किंवा अन्य वाहनांचा मोठा आवाज करुण नाहक त्रास देत असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिस निरीक्षक वाघमोडे यांनी केले आहे. त्यांच्यावर कडक करवाई केली जाणार आहे.