म्हशीचे अपहरण करून व्हॉटस्अॅपवर मागितली खंडणी !

उज्जैन : वृत्तसंस्था

खंडणीसाठी गुन्हेगारांकडून व्यक्तीचे किंवा मुलाचे अपहरण केल्याचे आपण ऐकले असेल किंवा वाचले असेल. परंतु उज्जैनमध्ये आरोपीने चक्क एका म्हशीचे अपहरण करुन म्हशीच्या मालकाकडे ८० हजार रुपयांची खंडणी मागितली. आरोपीने म्हशीचे अपहरण केल्याची माहिती व्हॉटस्अॅपवरुन मालकाला दिली तसेच अपहरण करण्यात आलेल्या म्हशीचा  फोटो देखील पाठवला. याची तक्रार देण्यासाठी मालक पोलीस ठाण्यात गेले त्यावेळी त्यांची तक्रार ऐकून पोलीस देखील चक्रावून गेले. या विचित्र गुन्ह्या प्रकरणी काय कारवाई करावी असा प्रश्न त्यांना पाेलीसांना पडला आहे.
[amazon_link asins=’B07CJX9R4D’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’33fc836a-a3a8-11e8-bb0b-a39e011cdca0′]

उज्जैनच्या आक्याकोली गावात १३ ऑगस्टला सेवाराम यांची म्हैस हरवली होती. ते तिचा शोध घेत होते. तेव्हा १४ ऑगस्टला व्हॉटस्अॅपवर आलेल्या मेसेजने ते चक्रावून गेले. ‘तुझी म्हैस आमच्याकडे आहे. ती परत हवी असेल तर ८० हजार रुपये घेऊन ये’ असे त्या मेसेजमध्ये म्हटले होते. या मेसेजसोबत अपहरण करण्यात आलेल्या म्हशीचा फोटोही पाठवण्यात आला होता. सेवाराम यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या विचित्र प्रकाराने पोलिसही चक्रावून गेले आहेत. मात्र, यावर काय कारवाई करावी असा प्रश्न त्यांना पडला आहे.
[amazon_link asins=’B00B24DBIQ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’48d5bbfc-a3a8-11e8-a7c0-57d219759101′]

याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करूनही त्यांनी कोणतीच कारवाई केली नसल्याचे सेवाराम यांनी सांगितले. पोलीस ठाण्यात व्हॉटस्अॅप पाठवणाऱ्याच्या माहितीसह त्याचा प्रोफाईल फोटोही पोलिसांना दिल्याचे सेवाराम यांनी सांगितले. म्हशीचे अपहरण केलेल्यांनी शनिवारी पुन्हा फोन करून खंडणीची मागणी केली आहे. जर पैसे दिले नाहीत तर म्हैस दुसऱ्याला विकण्यात येईल अशी धमकीही देण्यात आली आहे. म्हैस मुर्रा जातीची असून बाजारात तिची किंमत ८० हजार रुपये आहे. तिच्या किंमतीएवढी खंडणीची मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस करावाई करत नसल्याने सेवाराम हतबल झाले आहेत.