ताज्या बातम्या

भरधाव कारची दुचाकीला धडक, दोन ठार

सिन्नर (नाशिक) : पोलीसनामा ऑनलाईन – भरधाव वेगात जाणाऱ्या कारची समोरुन येणाऱ्या दुचाकीला धडक बसली. यामध्ये दुचाकीवरील दोन कामगारांचा मृत्यू झाला. हा अपघात आज (गुरुवार) सकाळी पावणे आठच्या सुमारास सिन्नर-शिर्डी मार्गावर देवपूर फाट्याजवळ झाला.

अनंत नवनाथ यादव (वय, ३० रा. वल्हेवाडी) आणि पांडुरंग नामदेव पवार (वय, ३२ रा. कहांडळवाडी) अशी अपघातात मृत्यू झालेल्‍या कामगारांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अनंत आणि पांडुरंग हे मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील उद्योग समूहाच्या सुपर इंडस्ट्रीजमध्ये कामाला होते. बुधवारी रात्री उशिरा ते दोघे जण रात्रपाळीचे काम आटोपून गावाकडे चालले होते. यादरम्यान देवपूर फाटा शिवारात समोरून येणाऱ्या चारचाकीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात पांडुरंग पवार यांचा जागीच मृत्‍यू झाला तर अनंत यादव गंभीर जखमी झाले. स्‍थानिक नागरिकांनी त्‍यांना तात्‍काळ रुग्‍णालयात हलविले. मात्र, उपचाराआधीच अनंत यांचाही मृत्‍यू झाला. पुढील तपास सिन्नर पोलीस करीत आहेत.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या

Back to top button