”ज्या रंगाची गोळी माझ्या अंगाला शिवून जाईल, तो रंग या देशात राहणार नाही ऑफिसर”

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बहुचर्चित ठाकरे हा चित्रपट २३ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार असून, याकडे चाहत्यांचं लक्ष लागून राहील आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन साठी नवाजुद्दीन सिद्दीकी आणि संजय राऊत हे एका पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित असताना , बाळासाहेबांची भूमिका साकारताना यात तुमचा आवडता डायलॉग कोणता असं नवाजुद्दीन सिद्दीकी यांना विचारलं असता ज्या रंगाची गोळी माझ्या अंगाला शिवून जाईल तो रंग या देशात राहणार नाही ऑफिसर हा डायलॉग त्यांनी सांगितला. इतकंच नाही यावेळी संजय राऊत यांना ही विविध प्रश्न विचारण्यात आले.
यावेळी २०१९ निवडणुकांमुळेच हा सिनेमा प्रदर्शित करण्यात येत आहे का असं विचारल्यावर असं काही नाही, याची तयारी खूप आधी पासून चालू आहे आता तो पूर्णत्वास आला आहे म्हणून प्रदर्शित होत आहे. असं राऊत म्हणाले .
ठाकरे चित्रपटासाठी मराठीच दिग्दर्शक का अभिजित पानसे यांची निवड तुम्ही केली का असं विचारल्यावर संजय राऊत यांनी हो मराठीच दिग्दर्शक पाहिजे होता कारण बाळासाहेबांना अभिजीत नी जवळून पाहिलं होत आणि मी हि कित्येक वर्षांपासून अभिजीत ला ओळखतो असं राऊतांनी सांगितले. याच वेळी बाळासाहेबांची भूमिका साकारताना नवाजुद्दीन सिद्दीकी जर आजच्या परिथितीला बघत असतील तर त्यांच्या मते आज भाजपा शिवसेनेची युती झाली असती का किंवा बाळासाहेबांनी ती होऊ दिली असती का यावर नवाजुद्दीन सिद्दीकिंना बोलू न देता. चित्रपटाविषयी प्रश्न विचारा असं म्हणून त्यांनी उत्तर देणं टाळलं.
दरम्यान ठाकरे चित्रपटात ठाकरेंचा मराठी आवाजात बदल करण्यात यावा अशी चर्चा सगळीकडे चालू असताना यावर राऊत यांना प्रश्न विचारला असता आमहाला बाळासाहेबांची नक्कल करायची नाही त्यांचा आवाज सगळ्यांनीच ऐकला आहे. मात्र त्यांचा विचार नव्या पिढीपर्यंत पोहचवणे महत्वाचे आहे, त्यावर आम्ही काम करत आहोत. असं ही राऊत म्हणाले.