बोगस पशुवैद्यकीय डॉक्टर विरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पशुवैद्यकीय डॉक्टर नसताना बनावट प्रिस्क्रिपशन पॅड तयार करुन पशुपालकांकडून पैशांची लुट करणाऱ्या तीन बोगस डॉक्टर विरुद्ध हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

इशितालाल (वय-३५ रा. अॅमनोरा पार्क, हडपसर) डॉ. दिलीप पी. सोनुने (वय-३०), डॉ. अपुर्वा गुजराथी (वय-२८) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या डॉक्टरांची नावे आहेत. याप्रकरणी जिल्हा चिकित्सलयाचे सहायक आयुक्त डॉ. अनिल रामकृष्ण देशपांडे (वय-४७ रा. येरवडा) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मे २०१८ मध्ये योगेश गवळी यांच्या श्वानाचा मृत्यू झाला होता. त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी चुकीचे उपचार केल्याने श्वानाचा मृत्यू झाला होता. गवळी यांनी आपला पाळीव श्वान दगावल्यामुळे पाठपुरावा करून चुकीचे उपचार करणाऱ्या व अवैध पशु रुग्णालय चालविणाऱ्या दोन पशुवैद्यक डॉक्टर व सहाय्यकाविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे.

गुन्हा दाखल करण्यात आलेल्या डॉक्टरांकडे प्रण्यांना तपासण्याचा परवाना नसताना देखील त्यांनी डॉ. सोनूने यांचे प्रिस्क्रीपशन पॅडवर आपला रबरी शिक्का मारून त्याचा वापर केला. या प्रिस्क्रीपशन पॅडवर पशुमालकांना औषधे लिहून देऊन त्यांच्याकडून पैसे उकळले. तसेच अपुर्वा गुजराथी यांनी माय केअर क्लिनीक हे नियबाह्य चालवून पशुमालकांकडून पैसे घेऊन त्यांची लुट केली. फिर्यादी अनिल देशपांडे यांनी प्रकरणाचा उलघडा केल्यानंतर पोलिसांनी पशुवैद्यकीय विभागाकडे पत्रव्यवहार केला. त्यामध्ये आरोपी डॉक्टर यांच्याकडे परवाना नसल्याचे समोर आले.त्यानुसार हडपसर पोलिसांनी डॉक्टरांवर गुन्हा दाखल केला. पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.