पोलीस ठाण्यात विष पिऊन आलेल्या प्रेमी युगलाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाईन

अरुण ठाकरे

मुरबाड तालुक्यातील इंदे गावातील एका प्रेमी युगुलाने विष पिऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे या प्रेमी युगलाला पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. त्यावेळी ते विष प्राशन करुन पोलीस ठाण्यात आले होते. पोलीस ठाण्यात त्यांची प्रकृती खालावल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचरादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cb75b455-c57e-11e8-873e-0b0941454711′]

बाळाराम वसंत वाघ (वय-२१) व गायत्री विजय चौधरी (वय-१७ दोघे रा. इंदे) अशी आत्महत्या केलेल्या प्रेमी युगलाची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बळाराम आणि गायत्री यांचे एकमेकांवर प्रेम होते. हे दोघे २८ सप्टेंबरला घरातून पळून गेले होते. दोघांच्या कुटुंबीयांनी शोध घेतला मात्र ते सापडले नाहीत. त्यामुळे दोघांच्या घरच्यांनी टोकावडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. घरच्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याचे समजताच रविवारी (दि.३० सप्टेंबर) दुपारी साडेतीनच्या सुमारास दोघेही टोकावडे पोलीस ठाण्यात हजर झाले होते.

पोलीस ठाण्यात हजर होण्यापूर्वी या दोघांनी विषारी औषध प्राशन केले होते. ही गोष्ट टोकावडे पोलिसांना समजताच त्यांनी दोघांनाही टोकावडे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दोघांचीही प्रकृती खालावत असल्याने या ठिकाणी प्राथमीक उपचार करुन दोघांना उल्हासनगर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’d2c273a5-c57e-11e8-a783-8582955eaabb’]

सायंकाळी आठच्या सुमरास गायत्री चौधरी हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर बळाराम याचा आज (सोमवार) पहाटे पाचच्या सुमरास मृत्यू झाला. दोघांच्या मृत्यूमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मयत बळाराम वाघ याचे यापूर्वी लग्न झाले असून त्याला एक लहान मुलगा आहे. पुढील तपास पोलीस उप निरीक्षक सागर चव्हाण करीत आहेत.

‘या’ नेत्याच्या मुलाचे लवकरच होणार चित्रपट सृष्टीत एंट्री