ताज्या बातम्या

शिक्षणमंत्र्यांचा जाळला पुतळा

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयात विद्यार्थ्यांसोबत घडलेल्या प्रकाराबाबत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी माफी मागावी, अशी मागणी करुन तालुका प्रहार विद्यार्थी संघटनेतर्फे त्यांचा पुतळा जाळण्यात आला.

श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती येथे ‘विद्यार्थी संवाद’ या कार्यक्रमात शिक्षणमंत्री विनोद तावडे आले होते. येथे भाषण झाल्यानंतर एका विद्यार्थ्याने त्यांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली असता, त्यांनी टाळाटाळ केली. त्याचवेळी एका विद्यार्थी व्हिडिओ शूटिंग करीत होता. त्यावर त्याला अटक करण्याचे आदेश विनोद तावडेंनी दिले.

याकरिता सदर प्रकरणाबाबत प्रहार विद्यार्थी संघटना चांदूर बाजार तालुक्यातर्फे जाहीर निषेध करण्यात आला. विनोद तावडेंनी जाहीरपणे माफी मागावी, अशी मागणाी प्रहार विद्यार्थी संघटनेचे मतदारसंघप्रमुख निखिल ठाकरे, तालुकाप्रमुख ऋषिकेश पोहोकार, धीरज इंगळे, अजिंक्य बाकोडे आदींनी केली.

Tags
पूर्ण वाचा

इतर बातम्या